Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ जानेवारी, २०२५

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऐतिहासिक निर्णय! मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पुष्पगुच्छ व पोलीस मानवंदनेवर बंधने !



मुंबई राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या निर्णयात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पुष्पगुच्छ व पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या मानवंदनेवर बंधने आणून अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सचिवालयाकडून राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत मार्गदर्शक तत्वांबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे या परिपत्रकानुसार राज्याचे सर्व जिल्हाधिकारी सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना याबाबत स्पष्टपणे निर्देश देण्यात आले आहेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सचिवालयाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की मुख्यमंत्र्यांच्या दौरात कोणतेही अधिकारी पुष्पगुच्छ आणणार नाहीत तसेच मुख्यमंत्री महोदयांना पोलीस दलाकडून देण्यात येणाऱ्या मानवंदनीची प्रथा त्यांच्या दौऱ्यात बंद ठेवण्यात या आदेश दिले आहेत तसेच या निर्देशाचे तंतोतंत पालन करण्यात यावे अशी देखील स्पष्ट करण्यात आले आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सचिवालयाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकामुळे पुष्पगुच्छ यावर होणारा अतिरिक्त खर्च वाचणार आहे त्याचबरोबर एखाद्या जिल्ह्यातील एखाद्या तालुक्यात मुख्यमंत्र्यांचा दौरा असेल तर जिल्हा वरून पोलीस दल मानवंदनेसाठी जात असे त्यासाठी येणारा खर्च हा मोठा असल्याने तो टाळण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेमुळे राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्री व मंत्र्यांना देखील या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुष्पगुच्छ व मानवंदना मिळण्याची प्रथा बंद होणार आहे
?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या साप्ताहिक बैठकीनंतर घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे शासनाच्या खर्चात एक प्रकारे बचत होणार आहे तर नव्याने झालेल्या मंत्र्यांना व राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील या निर्णयाचा मोठा फटका बसणार असल्याचे राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केले जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध