Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ जानेवारी, २०२५

शास्त्रीनगर, चेंबूर येथील खान्देश मित्र मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न



तरूण गर्जन रिपोट

. समाज उद्धाराचे कंकण बांधणाऱ्या सावित्रीआईंनी स्रियांना कर्तृत्वाच्या आकाशात झेप घेण्यासाठी शिक्षणाचे बळकट पंख दिले "

प्रतिनिधी : भुषण महाजन

              असे प्रतिपादन मुंबई माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. प्रकाश संतोष माळी यांनी क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्त सोसायटी हॉल शास्त्रीनगर, वाशी नाका, चेंबूर येथे खान्देश मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमात केले. महिलांचा सन्मान करणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे मुंबई महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रेखा मुरलीधर महाजन, ख्यातनाम शिक्षिका सौ. वैभवी सुनिल महाजन, अँड.सौ. कमलेश्वरी मॅडम व कार्यक्रमाच्या

 अध्यक्षा रत्ना जगन्नाथ माळी* तसेच विशेष अतिथी प्रा.डॉ. प्रकाश संतोष माळी व प्रा. सुनिल भाऊलाल महाजन व अमर भाई यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाली. या प्रसंगी छबुलाल माळी, सागर जामनिक, हरकभाई सिंग, दुर्गाताई ढगे, छायाताई साळुंखे, पुजाताई कोकरे, विकास गवस, मायाताई साखरे व उपस्थित यांनी

 सावित्रीआईंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. माळी समाजातील बंधू-भगिनींसोबत इतर समाजातील बंधू-भगिनींनी देखील सावित्रीआई फुले यांना आदरांजली वाहिली. यावेळी सौ. रेखा मुरलीधर महाजन, अँड.सौ. कमलेश्वरी मॅडम, सौ. वैभवी सुनिल महाजन प्रा.डॉ. प्रकाश संतोष माळी, प्रा.सुनिल भाऊलाल महाजन, यश वसंतराव माळी यांनी सवित्रीआईंच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले. यावेळी सौ. रत्ना जगन्नाथ माळी यांनी गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कु. मानसी जितेंद्र माळी, कु. मनस्वी जितेंद्र माळी, कु. तेजल चुनिलाल महाजन व कु. गार्गी शंकर पाटील या छोट्या मुलींनी सादर केलेले नृत्य व इंग्रजीमधून व्यक्त केलेले सवित्रीआईं विषयी विचार


 कौतुकास्पद ठरले. सर्व सहभागी मुलामुलींचे सौ. रत्ना जगन्नाथ माळी व सौ. शुभांगी शशिकांत महाजन यांनी भेटवस्तू देऊन कौतुक केले. तसेच आपल्या संसाराला हातभार लावणाऱ्या सावित्रीच्या लेकी सौ. मंगल वसंत माळी व सौ. चेतना ज्ञानेश्वर माळी यांचा प्रा. सुनिल महाजन व सौ. वैभवी महाजन यांच्याकडून भेटवस्तू देऊन विषेश सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शशिकांत मोतीलाल महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरेश पंडीत लोखंडे, वसंत नथ्थू माळी, दिलीप भोजू महाजन, जगन्नाथ दयाराम माळी, शशिकांत मोतीलाल महाजन, प्रकाश आनंदा महाजन, ज्ञानेश्वर छबुलाल माळी, जितेंद्र छबुलाल माळी, रविंद्र छबुलाल माळी, चुनिलाल गोकुळ महाजन, विक्रम भगवान महाजन, विजय रामकृष्ण महाजन व भूषण नामदेव महाजन यांच्यासह सर्व युवक, युवती व भगिनींनी विशेष मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध