Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २ जानेवारी, २०२५

नायलॉन मांजा विकणारा एलसीबीच्या जाळ्यात




अमळनेर : बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या गांधलीपुरा येथील एकावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याच्या जवळून १० हजार ८०० रुपयांचे १२ बंडल जप्त करण्यात आले आहेत.

एलसीबी चे पोलीस नाईक रवींद्र पाटील , पोलीस नाईक दीपक माळी याना गोपनीय माहिती मिळाली की गांधलीपुरा भागातील दर्गाअली मोहल्ल्यातील इमाम शेख अहमद शेख वय ५५ हा शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा विक्री करीत आहे. ३१ रोजी दुपारी साडे बारा वाजता छापा टाकून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्या जवळून ९०० रुपयाला एक याप्रमाणे मोनो केटीसी फायटर कंपनीचा १२ बंडल नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ ,१२५ व पर्यावरण संरक्षण अधिनियम १९९६ च्या कलम ५ , १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध