Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ जानेवारी, २०२५
Home
/
Unlabelled
/
अमळनेर तालुक्याला प्रधानमंत्री आवास योजनेचे नवीन साडे पाच हजार घरकुल उद्दिष्ट प्राप्त
अमळनेर तालुक्याला प्रधानमंत्री आवास योजनेचे नवीन साडे पाच हजार घरकुल उद्दिष्ट प्राप्त
जळगाव जिल्ह्याला पुन्हा ५८ हजार ४७९ घरकुल उद्दिष्ट मिळाले.
अमळनेर : पंतप्रधान आवास योजनेनंतर्गत तालुक्यासाठी २७ जानेवारीला ५ हजार ५८१ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. सप्टेंबर मधील २५२९ घरकुल मिळून २४-२५ साठी ८ हजार ११० घरकुल उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.*_
महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात ३ लाख ३७ हजार ८९ घरकुल उद्दिष्ट होते २७ रोजी १३ लाख २९ हजार ६७८ घरकुल उद्दिष्ट आले. यावर्षी १९ लाख६६ हजार ७६७ घरकुल तर जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात ३३ हजार ९२३ घरकुल उद्दिष्ट होते नुकतेच ५८ हजार ४७९ घरकुल आले. २०२४-२५ मध्ये एकूण ९२ हजार ४०२ घरकुलांचं उद्दिष्ट प्राप्त झाले आहेत.
अमळनेर तालुक्यात सर्वसामान्य व्यक्तींसाठी प्रधानमंत्री आवास योजनेत २०१६-१७ ते २०२१-२२ पर्यँत ६ हजार ३९८ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. त्यापैकी ५३६५ पूर्ण
झाले आहेत. १०३३ घरकुल बांधणे बाकी आहे.
🏠 ओबीसी साठी मोदी आवास योजनेंतर्गत २७४६ घरकुलचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्यापैकी ४०० पूर्ण झाले आणि उर्वरित कामे सुरू आहेत.
शबरी आवास योजनेनंतरंगत २०१६-१७ ते २०२३-२४ दरम्यान १६०८ घरकुल उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यात ८६० घरे पूर्ण झाली आहेत व ७४८ घरे बाकी आहेत.
रमाई आवास योजने अंतर्गत १६-१७ ते २३-२४ पर्यंत १३६५ घरकुल उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. पैकी १०१२ पूर्ण झाले आहेत. २५३ घरकुल बांधायचे बाकी आहेत. अमळनेर तालुक्यात ग्रामीण भागात सुमारे ४१ हजार कुटुंबे आहेत. त्यापैकी २५ हजार कुटुंबांना लाभ मिळणार आहे
ज्या कुटुंबांची नावे ड यादीत आहेत. ज्यांच्याकडे स्वतःची जागा आहे अशा कुटुंबाना एक लाख २० हजाराचे अनुदान मिळते. ज्यांची स्वतःची जागा नाही त्यांना शासन जागा खरेदी करायला ५० हजार रुपये अनुदान देते किंवा ग्रामपंचातीची गावठाण जागा असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारींच्या परवानगीने गावठाण जागा किंवा शासकीय गट असेल तर जिल्हाधिकारीच्या परवानगीने घरकुल साठी जागा देण्यात येते. - एन आर पाटील ,गटविकास अधिकारी पंचायत समिती अमळनेर
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे गावाच्या शेतकऱ्यांना आमदार मंजुळाताई व धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख श्री तुळशीराम गावित यांच्या विशेष प्रयत्नमुळे ट्र...
-
गाव पातळीवरील माहितीने महसूल व पोलीस प्रशासनाच्या कार्यात पोलीस पाटलांची मदत- माजी मंत्री अनिल पाटीलमारवड येथे पोलीस पाटील दिनानिमित्त जिल्ह्यातील पोलीस पाटलांची कार्यशाळा संपन्न प्रतिनिधी अमळनेर- पोलीस व महसूल प्रशासनातील महत्वाचा दुवा म्...
-
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षांचा टेकू घेऊन भाजप प्रणित एनडीए सरकार सत्तेत आल...
-
जळगाव जिल्ह्याला पुन्हा ५८ हजार ४७९ घरकुल उद्दिष्ट मिळाले. अमळनेर : पंतप्रधान आवास योजनेनंतर्गत तालुक्यासाठी २७ जानेवारीला ५ हजार ५...
-
पती गंभीर जखमी,एस टी चालकाविरुद्ध फिर्याद अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ शिवारात धुळे रस्त्यावरील सेंट मेरी हायस्कुल जवळ एस टी बस व दुचाकी ...
-
धुळे (प्रतिनिधी)- तालुक्यातील नंदाणे येथील लाचखोर सरपंच व माजी सरपंच धुळे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. सरपंच रविंद्र पाटील व माजी सरपंच अतु...
-
मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देतांना संघटनेचे राज्य सल्लागार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे पारोळा (प्रतिनिधी) राज्यातील मनरेगाचे ग्राम...
-
विझास्ट हा दृष्टिहीनांना मदत करणारा छोटासा डिव्हाईस आहे. आगपेटीएवढा हा डिव्हाईस छातीवर लावून ठेवता येतो,आणि समोर दिसणाऱ्या वस्तूंचे वर्णन कर...
-
अमळनेर : प्रशासनाच्या सतर्कतेने बालविवाह रोखण्यात आला असून अल्पवयीन मुलीच्या पालकांना पोलिसांनी सक्त ताकीद देऊन सोडले आहे. मुलीला बाल...
-
मुंबईत नवीन वर्षाच्या पहाटेच रेल्वे पोलीस हवालदार विजय चव्हाण (४२) यांची दोघांनी गळा दाबून हत्या केली होती. हवालदार विजय चव्हाण यांचा खून कर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा