Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २१ जानेवारी, २०२५

मुडी येथे अवैध वाळूचे तीन ट्रॅक्टर पकडले,




अमळनेर : तालुक्यातील मुडी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. तिन्ही ट्रॅक्टर अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.

उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या नेतृत्वात वावड्याचे मंडळाधिकारी पी एस पाटील, नगाव चे मंडळाधिकारी व्ही पी पाटील , ग्राम महसूल अधिकारी ए बी सोनवणे , सारबेट्याचे महसूल अधिकारी आशिष पारध्ये , शिरसाळे बु चे जितेंद्र पाटील , जैतपिर मांडळ चे जितेंद्र पाटील यांनी २० रोजी रात्री मुडी प्र डांगरी येथे अचानक छापा टाकला असता त्यांना मनोज देडगे यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ बी जी ४६६५ , शुभम सूर्यवंशी यांचे ट्रॅक्टर नम्बर एम एच १८ बी एक्स ५८६६ , सुनील भिल यांचे ट्रॅक्टर नम्बर एम एच १९ ए एन ७६३६ हे अवैध वाळू वाहतूक करताना अडबलून आले. पथकाने ट्रॅक्टर महसूल आवारात जमा केले आहेत. तिघांवर कारवाई करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध