Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २० जानेवारी, २०२५

साक्री तालुक्यातील युवक-युवती सुजाण नागरिक म्हणून पुढे आल्यास,बालविवाह सारखी कूप्रथा समूळ नष्ट करणे शक्य आहे तीच काळाची गरज आहे.असे प्रतिपादन साक्रीच्या विधिज्ञ तथा नगरसेविका अँड्.पूनम शिंदे-काकुस्ते यांनी केले.



उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगाव व उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय दहिवेल यांच्या संयुक्त विद्यमाने भोणगाव ता.साक्री येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबीरात बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 या विषयावर बोलत होत्या.
या प्रसंगी विध्यार्थी आणी श्रोत्यांना मार्गदर्शन करताना अँड्.काकूस्ते म्हणाल्या की,खऱ्या अर्थाने बालविवाह प्रतिबंधक कायदा हा डॉ राजाराम मोहन राय,ईश्वरचंद्र विद्यासागर सारख्या समाजसुधारकांच्या प्रयन्तनातून व ब्रिटिश सरकारच्या मदतीने २९ सप्टेंबर १९२९ रोजी अंतर्गत स्पेशल मॅरेज ॲक्ट अमलात आणून बालविवाहस प्रतिबंध करण्यात आला.परंतु आज २०२५ उजाडल्यानंतरही भारतीय समाज व्यवस्थेत बालविवाह सर्रासपणे होताना दिसतात ही खेदाची बाब आहे.जो वर समाजव्यवस्थेमध्ये असणारा स्त्रीपुरुष भेद,स्त्रीभ्रूणहत्या,हुंडापद्धती या कूप्रथा समूळ नष्ट होऊन स्त्री शिक्षणाचे प्रमाण वाढून कायद्याची कडक अंबलबजावनी होण्यासाठी समाजातील आजचा विध्यार्थी आणि उद्याचा नागरिक हा सुजाण नागरिक होऊन पुढे येत नाही. तोवर या बालविवाह सारख्या वाईट रूढी परंपरा समूळ नष्ट होणार नाहीत.यासाठी विध्यार्थीदशेतच तुम्ही उत्तम नागरिक होणे गरजेचे आहे. सभोवताली जर कुठे बालविवाह होत असेल तर त्वरित जाऊन तो थांबविण्याचे अवाहन करा. पालक ऐकत नसतील तर गावाच्या ग्रामसेवकडे तक्रार करा ते ही तक्रार घेत नसतील,तर वरीष्ठ यंत्रणेला कळवून त्या ग्रामसेवकावर ही गुन्हा दाखल केला जातो.एवढेच नव्हे तर संबंधित पालक व हजर असणारे नातेवाईक वधू वर पक्ष यांच्या वर बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात येतो.गुन्हा करणाऱ्यास दोन वर्षांची शिक्षा तसेच एक लाखाचा दंड आकारण्यात येतो.
सामाजिक बदलासाठी गावोगावी जनजागृती करण्याची व कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रा. पी डी राठोड यांनी माय इंडिया पोर्टल विषयी विध्यार्थीना मार्गदर्शन केले.या प्रसंगी व्यासपीठावर प्रा.योगेश कोरडे, प्रा.शिवप्रसाद शेवाळे,प्रा.वंदना पाटील उपस्थित होते.राष्टीय सेवा योजना एककातील विद्यार्थ्यांनी सूत्रसंचलन आणी आभार प्रदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध