Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २ जानेवारी, २०२५

अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर महसूल पथकाची कारवाई

  

  अमळनेर : अवैध रित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर अमळनेर महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली असून वाहन अमळनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.

      सडावन कन्हेरे येथे एक अनधिकृत गौण खनिज वाळू वाहतूक करणारे टेम्पो आढळल्याने ते पकडण्यात आले. सदर टेम्पो मुद्देमालासह पोलिस स्टेशन अमळनेर येथे जमा करण्यात आले. या पथकात ग्राम महसूल अधिकारी ए.बी. सोनवणे, अमळनेर,अशफाक पिंजारी  अमळनेर शहर पूर्व,प्रसाद पाटील मंगरूळ, परवर तडवी, निंभोरा, अदिती जरे अमळनेर शहर मध्य, राजेंद्र बारी जानवे,  राजेंद्र केदार पळासदडे, दीपक पाटील डांगर बु. यांचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध