Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३० जानेवारी, २०२५

शिरपूर शहर पोलीस स्टेशन तर्फे नागरीकांना अवाहन



शिरपुर शहर पोलीस स्टेशन आवारात मागील काही वर्षापासुन विवीध कंपन्यांच्या 113 मोटार सायकल बेवारस पडुन आहेत. सदर मोटार सायकल ताब्यात घेण्यासाठी मोटार सायकलचे कोणीही मालक पोलीस स्टेशनला आलेले नाहीत. तरी ज्या नागरीकांची मोटार सायकल शिरपुर शहर पोलीस स्टेशन येथील बेवारस वाहनांमध्ये असेल त्यांनी आपल्या वाहनाची खात्री करुन वाहन ज्यांच्या मालकीचे असेल त्यांनी मोटार सायकलचे कागदपत्रासह शिरपुर शहर पोलीस स्टेशन येथे दि.10.02.2025 रोजी पावेतो संपर्क साधुन आपली मोटार सायकल घेवुन जावी. विहीत मुदतीपर्यंत संपर्क न साधल्यास सदर मोटार सायकलचा फेब्रुवारी 2025 मध्ये लिलाव करुन त्याची विक्री करुन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध