Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ११ जानेवारी, २०२५

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर्फे विविध समस्या सोडवण्यासाठी हर्बिंजर ग्लोबल हॅकाथॉन या कंपनीचे शास्त्रज्ञ साक्री तालुक्याचे भूमीपुत्र श्री गौरव बिरारीस यांना विझास्ट या प्रकल्पाला २५ लाख रूपयांचे बक्षिस मिळाले आहे.



विझास्ट हा दृष्टिहीनांना मदत करणारा छोटासा डिव्हाईस आहे. आगपेटीएवढा हा डिव्हाईस छातीवर लावून ठेवता येतो,आणि समोर दिसणाऱ्या वस्तूंचे वर्णन करतो.वस्तूचे वर्णन करतांना तिची दिशाही डावीकडे, उजवीकडे, समोर,वर,खाली अशा प्रकारे सांगितली जाते. दर ५ सेकंदात बदललेली दिशा सांगितली जाते.त्यामुळे अंधांना दैनंदिन वस्तू शोधण्यास मदत होते. गॉगल,औषधे,चालण्याची काठी,खाद्यपदार्थ अशा अनेक गोष्टी अंध व्यक्ती दुसऱ्याच्या मदतीशिवाय शोधू शकतात.
रिझर्व्ह बँकेने हॅकाथॉनद्वारे ४ समस्यांसाठी नवीन प्रकल्पांचे आवाहन केले होते.अंध व दृष्टिबधित व्यक्तींना चलनी नोटा ओळखता याव्यात ही त्यापैकी एक समस्या होती.या हॅकाथॉनला जगभरातून ५३४ प्रतिसाद मिळाले. त्यात एकूण ५ प्रकल्पांना प्रोत्साहनपर बक्षिसे मिळाली.प्रत्येक समस्येसाठी एक,आणि सर्व प्रकल्पांत महिलांचा एक असे ५ पुरस्कार दिले गेलेत.त्यात विझास्टला महिलांचा सर्वोत्तम प्रकल्प म्हणून ₹ २० लाख आणि प्रात्यक्षिकासाठी ५ लाख अशी बक्षिसे मिळाली.चलनी नोटा आणि त्यांचा खरेपणा ओळखण्यासाठीही विझास्टचा उपयोग होऊ शकतो.नोटा ओळखण्याचे ML मॉडेल लोड करून प्रात्यक्षिक अचूकपणे केले गेले.
विझास्ट हा केवळ ३५ ग्रॅम वजनाचा स्वतंत्र डिव्हाईस आहे.त्याला इंटरनेट किंवा मोबाईल अशा कुठल्याच कनेक्शनची गरज नाही.बहुतांश मशीन लर्निग किंवा ए आय डिव्हाईसेस इंटरनेट किंवा मोठ्या कॉम्प्युटर्सवर अवलंबून असतात.
हा प्रकल्प क्रिमिशा देवरे आणि उत्कर्षा बोरसे यांनी विकसित केला.त्यांनी टायनी एम एल, इंटर आय सी साऊंड, आणि इमेज प्रोसेसिंग या तंत्रज्ञानांचा वापर केला.केवळ १५ दिवसांत सँपल डिव्हाईस तयार करण्यात आला.त्यांना 'कल्पसृष्टी'चे शास्त्रज्ञ गौरव बिरारीस यांचे मार्गदर्शन आणि किरण देवरे यांचे सहकार्य लाभले.
क्रिमिशा यांनी प्रकल्पाचे अंतिम सादरीकरण बंगलोर येथे केले.त्यांना रिझर्व्ह बँकेचे प्र.गव्हर्नर टी. रबी शंकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध