Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २२ जानेवारी, २०२५

एस टी बसच्या धडकेत महिला जागीच ठार




पती गंभीर जखमी,एस टी चालकाविरुद्ध फिर्याद

  अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ शिवारात धुळे रस्त्यावरील  सेंट मेरी हायस्कुल जवळ एस टी बस व  दुचाकी च्या झालेल्या अपघातात दुचाकीवर असलेली खडके  येथील महिला जागीच ठार तर तिचा पती गंभीर जखमी झाल्याची घटना  21 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.


       अरुणाबाई समाधान राजपूत वय 49 असे मयत महिलेचे नाव असून ती व तिचे पती समाधान रुपसिंग राजपुत दोन्ही राहणार खडके हे दुचाकी ने अमळनेर कडून खडके येथे जात असताना समोरून येणाऱ्या कल्याण रावेर एस टी बसने त्यांना जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला अरुणाबाई या जागीच ठार झाल्या तर समाधान हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना डॉ अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाऊंडेशन येथे दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


      दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी व त्यानंतर पोलिसात धाव घेऊन एस टी चालक विरुद्ध फिर्याद दिली आहे.रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध