Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १ जानेवारी, २०२५

अहो आश्चर्यम...अमळगावच्या शाळेत अदृश्य शिक्षक....




अमळगाव ता अमळनेर जि जळगाव येथील जि. प. शाळेत विद्यार्थी नियमित येतात.. शाळाही भरते...पण विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक दिसत नाहीत.... म्हणजे येथे कर्तव्यास असणारे शिक्षक शाळेत शिकवायला येतच नाहीत...याबाबत  मुलांकडून पालकांना समजल्यावर जागृत ग्रामस्थांनी सदरचा प्रकार ग्रामपंचायत सदस्यांच्या कानावर घातला होता.. ग्राम पंचायत सदस्यांनी वेळोवेळी शाळेत जावुन खात्री देखील केली.. शिक्षकांना फोन वर संपर्क केले नंतर उडवा उडवीची उत्तरे दिली जात होती.

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी देखील हाच प्रकार आढळून आल्याने ग्रामस्थ व सदस्यांनी शाळेत जावुन खात्री केली असता शिक्षक हजर मिळुन आले नाहीत..त्याबाबत ग्रामस्थांनी शिक्षकांना फोन केला असता गणवेश घेण्यासाठी अमळनेर येथे आलो आहे असे उत्तर मिळाले. हालचाल रजिष्टर चेक केले असता त्यावर कोणताही नोंद नव्हती याबाबत शिक्षकास विचारले असता तुमचा जेवढा पावर लावायचा लावा माझ कोण काही करु शकत नाही अस बेपर्वा उत्तर दिले.. 

शिक्षण हा एक संस्कार असुन त्याचा मुख्य शिल्पकार शिक्षक असतो...

पण अमळगावच्या शाळेतील शिक्षकांना येथील मुलांबाबत जिव्हाळा नाही.मुलांना घडवण्यात त्यांना कोणताही इंटरेस्ट नाही. शाळेत नेहमीच उशीरा येणे ही बाब नित्याचीच असुन अनेकदा तोंडी सुचना देवुन ही येथील शिक्षक ग्रामस्थांना जुमानत नाहीत. राजकीय वरदहस्त असल्यानेच त्यांचे फावले आहे... परंतु त्यामुळे अमळगावातील गोर गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाला घो बसला आहे.. एकेकाळी अमळगावची ही शाळा पंचक्रोशीत दर्जेदार शिक्षणासाठी नावाजलेली होती. स्कॉलरशीप नवोदय सारख्या परिक्षेत दरवर्षी शाळेचे विद्यार्थी मेरिट यादीत स्थान मिळवत होते. परंतु आता शाळेची पार वाट लागली आहे... शिक्षकांच्या उदासिन वागण्यामुळे शाळेतच न येण्याने, उशीरा येण्याने मुलांना देखील शाळेची गोडी वाटेनासी झाली  आहे. विद्यार्थी गळती मोठ्या प्रमाणावर वाढली असुन तुकडी कमी होण्याची वेळ आली आहे. पण तरी देखील शिक्षकांचा मुजोर पणा राजकीय वरदहस्तामुळे वाढला आहे. तुमचा जेवढा पावर आहे तेवढा लावा असा उलट दमच बेपर्वा शिक्षक ग्रामस्थांना देत आहे...
त्यामुळे अमळगावात सदरच्या शिक्षकांबद्दल तीव्र नाराजी असुन सदर  सदर शिक्षकाविरोधात तीव्र आंदोलन  उभारण्याचा मनसुबा ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध