Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, १९ जानेवारी, २०२५
वाडी येथील उत्खनन भाग 2..
..म्होरक्याचा बोले महसूल चाले..
गौण खनिजाचे अवैध उत्खनन यापूर्वीही करण्यात आले. उत्खनन करण्याकरिता काही गौण खनिज माफियांनी मोठ मोठे मशीन लावलेत वाडी परिसराला गौण खनिजाचा अड्डा बनवले असून. अनेक वृत्त पत्रात बातम्या प्रकाशीत झाल्यात तरी ह्या प्रकारांना आळा बसला नाही.तर वाडी येथे बिनधास्तपणे उत्खनन होत.
शिरपूर- शिरपूर तालुक्यातील महामार्गाच्या विस्तारीत कामावर वापरात येत असलेले गौण खनिज वाडी येथून अवैधपणे उत्खनन करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
अवैध उत्खनन प्रमाणापेक्षाही जास्त असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
सर्वाधिक उत्खनन वाडी बु.वाडी खुर्द परिसरात होत असल्याची माहिती आहे. मात्र,या गंभीर प्रकाराकडे ग्रामसेवक तलाठी,मंडळ अधिकारी, व नायब तहसीलदार आदी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अवैध उत्खनन जोरात सुरू आहे. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
शिरपूर तालुक्यातील महामार्गाच्या विस्तारीत कामावर वापरात येत असलेले गौण खनिज वाडी येथील खदानीतून अवैधपणे उत्खनन करण्यात येत असल्याचे दिसत आहे. अवैध उत्खनन प्रमाणापेक्षाही जास्त असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. सर्वाधिक उत्खनन तालुक्यातील वाडी परिसरात होत असल्याची माहिती आहे.
मात्र,या गंभीर प्रकाराकडे महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अवैध उत्खनन सुरू आहे. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
या प्रकराविरुद्ध तरुण गर्जना हे वृत्तपत्र आवाज उठवीत आहेत. मागील काळात या परिसरातील अवैध गौणखनिज उत्खनन बंद झाले होते. मात्र,आता पुन्हा संबंधितानी डोके वर काढलेले दिसत आहे. परिसरातील उत्खनन व त्या रस्त्यावर वापरलेले जाणारे गौण खनिजाची माहिती गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या माध्यमातून घेतल्यास सत्य समोर येईल. उत्खनन व शासनाचा महसूल बुडवण्याला जबाबदार असणा-यांविरुद्ध कारवाई व्हावी,अशी मागणी होत आहे.
तसेच या जाणून बुजून केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांकडे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे दुर्लक्ष होत आहे.
*वाडी येथील म्होरक्याकडे का? केले जाते दुर्लक्ष.*
*वाडी येथील म्होरक्या कडून शासनाची दिशाभूल करण्यासाठी वापरली जाते 3 ते 4 वाहनांना एकचं नंबर प्लेट.*
गौण खनिजाच्या माध्यमातून सुरू असलेले गौडबंगाल समोर आल्याशिवाय गैरप्रकार थांबणार नाहीत.एकाच रॉयल्टीवर अनेक वाहनातून अवैध गौण खनिज नेल्या जात आहे.मात्र,अवैध गौण खनिज माफिया साम,दाम,दंड भेदाचा वापर करुन अनेकांना खिशात घालत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच अवैध गौण खनिजाचे उत्खनन होत असताना त्याच्यावर कारवाई झाल्यास हे प्रकार थांबू शकतात.परंतु ती कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यापूर्वी तहसीलदार यांनी अवैध गौण खनिजाची वाहतूक करणा-यांना जागेवर आणायला हवे अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
आजपर्यंत अवैध गौण खनिज माफियांच्या विरोधात कोणी तक्रार करत नाही. कारण त्याच्याकडून धमकावल्या जात असल्याचे ऐकायला मिळत आहे.
या गंभीर प्रकाराकडे संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे,अशी मागणी जोर धरत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे गावाच्या शेतकऱ्यांना आमदार मंजुळाताई व धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख श्री तुळशीराम गावित यांच्या विशेष प्रयत्नमुळे ट्र...
-
गाव पातळीवरील माहितीने महसूल व पोलीस प्रशासनाच्या कार्यात पोलीस पाटलांची मदत- माजी मंत्री अनिल पाटीलमारवड येथे पोलीस पाटील दिनानिमित्त जिल्ह्यातील पोलीस पाटलांची कार्यशाळा संपन्न प्रतिनिधी अमळनेर- पोलीस व महसूल प्रशासनातील महत्वाचा दुवा म्...
-
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षांचा टेकू घेऊन भाजप प्रणित एनडीए सरकार सत्तेत आल...
-
जळगाव जिल्ह्याला पुन्हा ५८ हजार ४७९ घरकुल उद्दिष्ट मिळाले. अमळनेर : पंतप्रधान आवास योजनेनंतर्गत तालुक्यासाठी २७ जानेवारीला ५ हजार ५...
-
पती गंभीर जखमी,एस टी चालकाविरुद्ध फिर्याद अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ शिवारात धुळे रस्त्यावरील सेंट मेरी हायस्कुल जवळ एस टी बस व दुचाकी ...
-
धुळे (प्रतिनिधी)- तालुक्यातील नंदाणे येथील लाचखोर सरपंच व माजी सरपंच धुळे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. सरपंच रविंद्र पाटील व माजी सरपंच अतु...
-
मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देतांना संघटनेचे राज्य सल्लागार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे पारोळा (प्रतिनिधी) राज्यातील मनरेगाचे ग्राम...
-
विझास्ट हा दृष्टिहीनांना मदत करणारा छोटासा डिव्हाईस आहे. आगपेटीएवढा हा डिव्हाईस छातीवर लावून ठेवता येतो,आणि समोर दिसणाऱ्या वस्तूंचे वर्णन कर...
-
अमळनेर : प्रशासनाच्या सतर्कतेने बालविवाह रोखण्यात आला असून अल्पवयीन मुलीच्या पालकांना पोलिसांनी सक्त ताकीद देऊन सोडले आहे. मुलीला बाल...
-
मुंबईत नवीन वर्षाच्या पहाटेच रेल्वे पोलीस हवालदार विजय चव्हाण (४२) यांची दोघांनी गळा दाबून हत्या केली होती. हवालदार विजय चव्हाण यांचा खून कर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा