Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४

बापानेच केला ९ वर्षीय मुलीवर अत्याचार


तरूण गर्जन
रिपोट

शिरसाळे येथील रवींद्र वर पोक्सो चा गुन्हा दाखल

अमळनेर : पालनकर्ता बापानेच ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना १९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील शिरसाळे येथे घडली.


मध्यप्रदेशातील सेंदवा तालुक्यातील धांदरा येथील एक महिला पती दारूमुळे मेल्याने रेल्वेत भीक मागत होती. भीक मागताना तिची ओळख शिरसाळे येथील रवींद्र रणछोड पारधी याच्याशी झाली होती. त्याने मुलीसह महिलेला शिरसाळे येथे आणून झोपडीत राहू लागले होते. रवींद्र बांधकाम मजूर म्हणून काम करीत होता. मात्र चार पाच महिन्यांपासून त्याला दारूचे व्यसन लागल्याने तो महिलेला मारहाण करीत होता. तिला रेल्वेत भीक मागायला पाठवू लागला. महिला सुरत भुसावळ मार्गावर भीक मागून उदरनिर्वाह करीत होती. 


१९ रोजी भीक मागून ती परत आली असता तिला झोपडीत रवींद्र पारधी हा तिच्या ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत असताना दिसून आला. रवींद्र ने महिलेला घराबाहेर पडू न दिल्याने महिलेला पोलिसात फिर्याद देता आली नाही. मारवड पोलीस स्टेशनला महिलेने फिर्याद दिल्यावरून आरोपी रविंद विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(एफ)(एम) ६५(२), ३५१ (२) सह पोक्सो कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रवींद्र ला अटक करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध