Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

महिलेच्या गळ्यातून दोन तोळ्यांची पोत तोडुन पडाले

दै.तरूण गर्जना रिपोट

अमळनेर : रस्त्याने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातून दोन तोळ्यांची सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना १७ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास बाजार समितीच्या भिंतीच्या मागे गुरुकृपा कॉलनीत घडली.


रत्ना किशोर देसले वय ४५ रा प्लॉट न २७ गुरुकृपा कॉलनी या सायंकाळी बाजार समितीच्या भिंतीमागील रस्त्याने जात असताना अचानक दोन मजबूत बांध्याचे विशीतील तरुण काळा रंग व लाल पट्टेवाली मोटरसायकलवर येऊन रत्ना देसले यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावून नेली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध