Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ डिसेंबर, २०२४

पिंपळनेर येथील सामोडे रस्त्यालगत लक्ष्मी अग्रो इंडस्ट्रीज येथे धाडसी चोरी.... सुमारे आठ ते दहा लाखाची नवी शेती उपयोगी अवजारे चोरांनी पळून नेली



काल मध्ये रात्री अज्ञात चोरट्यांनी साक्री पिंपळनेर सामोडे परिसरात हायवे लगत में लक्ष्मी अग्रो इंडस्ट्रीज सामोडे या कंपनीचे मालक शाम भदाणे सामोडे यांच्या मालकीचा शेती उपयोगी अवजारे बनवणाऱ्या कंपनीत काल रात्री धाडसी चोरी करण्यात आली यात त्यांचे शेती उपयोगी अवजारे त्यात तीन नागर दोन ट्रेलर दोन रोटावेटर तसेच दोन वेल्डिंग मशीन कलर मशीन तसेच इतर किरकोळ साहित्य म्हणजेच सुमारे आठ ते दहा लाखाची लोखंडी शेती उपयोगी अवजारे चोरट्यांनी चोरून नेले आहेत साक्री तालुक्यासह पिंपळनेर सामोडे परिसरात अशा चोरीच्या घटना अनेकदा घडले आहेत पिंपळनेर समोडे परिसरातच काही दिवसापूर्वीच एका शेतकऱ्याचे तब्बल दहा ते बारा क्विंटल सोयाबीन चोरट्यानी चोरून नेले तसेच काही शेतकऱ्यांच्या चाळीतून अक्षरशा कांद्याच्या गुण्या भरून चोरट्यांनी पळून नेल्या या संदर्भात सर्व शेतकऱ्यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे परंतु पोलिसांना अजूनही चोरट्यांना शोधण्यात यश आलेले नाही पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या कामगिरीबद्दल परिसरातील लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.त्यामुळे पोलीस यंत्रणेने कसून चौकशी करत व तंत्रज्ञानाचा वापर करीत चोरांच्या मुसक्या आवळल्या तरच परिसरामधील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध