Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४

युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना नियमित सेवेत घेण्याची मागणी



अमळनेर प्रतिनिधी:तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींनी नियमित सेवेत घेण्याची मागणी करत प्रशासनासह लोकप्रतिनिधींना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.

अमळनेर तालुक्यात १३३ शाळांवर १३२ प्रशिक्षणार्थी सध्या कार्यरत असून १४ सप्टेंबर पासून सहा महिन्यांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २३ रोजी सर्व प्रशिक्षणार्थींनी आमदार अनिल पाटील, उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा आणि गटविकास अधिकारी एन आर पाटील यांना निवेदन दिले. सहा महिन्याची मुदत संपल्यावर सर्व प्रशिक्षणार्थीं ज्या शाळेवर कार्यरत आहेत तेथेच त्यांना नियमित सेवेची संधी द्यावी, २५ हजार रुपये मानधन वाढवून द्यावे, शासकीय कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सर्व सेवांचा लाभ मिळावा, सर्व प्रकारच्या नोकर भरतीत प्रशिक्षणार्थींसाठी १० टक्के जागा राखीव ठेवाव्यात अश्या विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. 


सदर निवेदन देतेवेळी सुदिप साळुंखे, निलेश बोरसे, वृंदा पाटील, जगतसिग शिंदे, तुषार शिंदे, अरुण पाटील, प्रदीप खैरनार, हेमंत पाटील, दिपाली पाटील, कविता पाटील, भाग्यश्री पाटील, सोनल पाटील, जितेंद्र भोई, वेदिका चौधरी, दिनेश पाटील, कोमल पाटील, दिव्या बिहाडे, पल्लवी पाटील, मोहिनी रत्नपारखी, रुपाली पाटील, मनिषा महाले, जयश्री पाटील, अर्चना पाटील, प्रवीण पाटील, मनिषा पाटील, चंद्रशेखर पाटील यांच्यासह १३२ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध