Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ डिसेंबर, २०२४

थाळनेरला १२ शेतकऱ्यांच्या केबल चोरीला



थाळनेर (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील थाळनेर शेत शिवारातील बारा शेतकऱ्यांच्या शेती पंपांच्या केबल व स्टार्टर अज्ञात चोरट्यांनी रात्रीचा फायदा घेत कापून नेल्या आहेत. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 
    
याबाबत थोडक्यात वृत्त असे की २७-१२-२४ शुक्रवार रोजी सकाळी १ते ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी थाळनेर शेत शिवारातील शेतकरी जयपाल रजेसिंग जमादार,शैलेंद्रसिंग जमादार, युवराजसिंग जमादार,शरद जमादार,भोजूसिंग  मगनसिंग जमादार,दरबार शांतीलाल जमादार,दिपेंद्रसिंग दरबारसिंग जमादार,अंबालाल जमादार,
जयपालसिंग भोगेंद्रसिंग जमादार,
दिलीपसिंग भोगेंद्रसिंग जमादार,
योगेंद्रसिंग जमादार,राजेंद्र पंडित चौधरी,क्षेत्रपाल प्रेमसिंग राजपूत सर्व राहणार थाळनेर या शेतकऱ्यांचे शेतातील मोटारींच्या केबल व स्टार्टर अज्ञात चोटयांनी अंधाराचा फायदा घेत चोरून नेल्यात. शेतकऱ्यांच्या केबल चोरीमुळे रब्बी हंगामाच्या पिकांना पाणी देण्याचे थांबले आहे. 

शेतकऱ्यांना या केबल व स्टार्टर चोरीमुळे आर्थिक भुरदंड बसून वेळही जाणार आहे.या महिन्याच्या सुरुवातीला ही पोलीस स्टेशनला लागून असलेल्या शेतातल्या मोटारींच्या केबल चोरीला गेल्या होत्या. त्यामुळे या केबल चोरांचे मनोबल वाढले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरींचं हे प्रमाण गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून पोलिसांनी या केबल चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध