Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

बहाळ ग्रामपंचायतीचा सरपंच, लिपिकसह एक खाजगी पंटर दोन लाखांची लाच घेतांना धुळे एसीबीच्या जाळ्यात..!



दहा लाखांची लाचेची मागणी भोवली.

चाळीसगाव प्रतिनिधी :- चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे येथे त्यांचे मालकी कब्जे वहीवाटीतील शेतजमीनीवर ग्रामपंचायत बहाळ हे त्यांचा हक्क दाखवुन सदरची जागा परस्पर भाडेतत्वावर देण्याची माहिती तक्रारदारास मिळाल्याने तक्रारदार यांनी न्यायालयाकडुन ग्रामपंचायत बहाळ यांचेविरुध्द कायम स्वरुपी मनाई हुकुम आणला परंतु सरपंच राजेंद्र महादु मोरे यांनी तक्रारदार यांना भेटुन तुम्हाला तुमची शेतजमीन तुम्हाला परत मिळवून देतो पण शेतजमीनीतुन दिड हजार चौरस फुटाचा प्लॉट त्यांना खरेदी करुन दयावा लागेल असे त्यांनी सांगितले.तेव्हा तक्रारदार यांनी प्लॉट शकणार नसल्याबाबतचे सांगितले परंतु दोघांच्याही संभाषणानंतर सरपंच राजेंद्र मोरे यांनी दहा लाख रुपये दयावे लागतील अन्यथा ग्रामपंचायतीकडुन तुम्हाला कोर्टाचा नाहक त्रास सहन करावा लागेल असल्याचे सांगितले व तक्रारदार  यांनी लाच लुचपत विभाग धुळे येथे तक्रार दिली होती.

त्यानुषंगाने तक्रारदार यांनी दिलेल्या  दहा लाख रुपयाच्या लाचेची मागणी करुन तडजोडीअंती पाच लाख रुपये घेण्याचे मान्य केले व त्यानंतर सरपंच राजेंद्र मोरे व लिपीक शांताराम बोरसे यांनी तक्रारदार यांना भेटुन लाचेची रक्कम तक्रारदार यांच्या राहते घरी  खाजगी इसम सुरेश ठेंगे मार्फत देण्याचे सांगितले होते.त्यानुसार तक्रारदार यांचे बहाळ येथील राहत्या घरी सापळा लावत सरपंच राजेंद्र मोरे व लिपीक शांताराम बोरसे यांनी सांगितल्या प्रमाणे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपये रोख रक्कम स्विकारतांना खाजगी इसम सुरेश ठेंगे यांना रंगेहात पकडण्यात आले असुन सरपंच राजेंद्र मोरे,लिपीक.शांताराम बोरसे,व खाजगी इसम सुरेश ठेंगे यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक, शमिष्ठा घारगे वालावलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे,पोलीस निरीक्षक पंकज शिंदे,पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी,तसेच पथकातील राजन कदम,मुकेश अहिरे,संतोष पावरा,प्रविण मोरे, रामदास बारेला,प्रविण पाटील, सुधीर मोरे,जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध