Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

भाजपचे किसान सेलचे महामंत्री शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांच्या कामाची दखल लोकमत वृत्त समूहाने घेतली लोकमत बागलाण गौरव पुरस्काराने केले जाणार सन्मानित



बागलाण म्हणजे जंगल,वाघांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेला हा भाग आधुनिक काळामध्ये शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून फळबागायतीचा प्रदेशही झाला आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला मोठा धार्मिक इतिहासही आहे.मांगीतुंगी येथील जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र तसेच देवमामलेदार,उद्धव महाराज,शंकर महाराज व दावल मलिक बाबा यांच्या सहवासाची भूमी म्हणूनही बागलाणचा उल्लेख नेहमी होत असतो. आधुनिक काळामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये विविध प्रयोग करीत कांदा,द्राक्ष आणि डाळिंबांची लागवड करीत हा प्रदेश सुजलाम सुफलाम बनविला आहे.अशा या ऐतिहासिक,पौराणिक भूमीमधून अनेक व्यक्ति या आपल्या कामाने मोठ्या झाल्या आहेत.त्यांच्या कार्याची वाहवा होत आहे.अशा कर्तृत्ववान व्यक्तिंचा बागलाण गौरव पुरस्काराने सन्मान करीत आहोत. शेतकरी मित्र भाजप किसान मोर्चाचे महामंत्री बिंदू शेठ शर्मा यांच्या कामाची दखल लोकमत वृत्त समूहाने घेतली आहे त्यांची कामगिरी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात अतिशय वाकड्याजोगी आहे शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न असोत शेतकऱ्याचे बँकेचे प्रश्न असो शेतकऱ्याचे पीक विम्याचे प्रश्न असो अशा एक नाहीतर अनेक समस्यांवर शेतकऱ्यांना एक संजीवनी ठरणारे बिंदू शेठ शर्मा हा अवलिया आहे या माणसाचा लोकमत वृत्तसमहाकडून एक छोटे कानी पुरस्काराचे आयोजित केले आहे तरी आपण सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे ही बिंदू शेठ शर्मा यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे

• दिनांक : सोमवार, दि. 30 डिसेंबर 2024

• वेळ : दुपारी 2 वाजता

• स्थळ : बाबाज मंगलाष्टक, कंधाना फाटा, सटाणा

बी.बी.चांडक
लोकमत उपाध्यक्ष

मिलिंद कुलकर्णी
लोकमत कार्यकारी संपादक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध