Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, २५ डिसेंबर, २०२४
वाघाडी जवळ पावणे तीन लाखांचा दारुसाठा जप्त...!
शिरपूर प्रतिनिधी:-गुजरात येथून महाराष्ट्रात विदेशी मद्याची तस्करी करणारे वाहन तालुक्यातील वाघाडीनजिक जप्त करण्यात आले. या कारवाईत २ लाख ७६ हजारांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली. ही कारवाई दि.२४ रोजी रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली.
याबाबत वृत्त असे की, नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे. त्या अनुषंगाने तालुक्याच्या सीमावर्ती गस्त वाढविण्यात आली आहे. दि. २४ रोजी गस्त घालीत असर्ताना गुजरात राज्यातून शिरपूरकडे अवैध दारु वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकास मिळाली,
माहितीच्या आधारे तालुक्यातील शिरपूर-शहादा रस्त्यावर वाघाडी येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ सापळा रचण्यात आला. मध्यरात्रीच्या वेळी शहाद्याकडून शिरपूरकडे भरधाव वेगात मिनी ट्रक संशयास्पद येतांना पथकाच्या निदर्शनास आले. संशयावरुन वाहन (जीजे ०५ बीयू ०७०९) अडविण्यात आले. चालकास विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. पथकाने वाहनाची झडती घेतली असता वरच्या बाजूने प्लस्टिकचे कॅरेट दिसून आले. मात्र आत डोकावून पाहिले असता दारूसाठा मिळून आला.
या कारवाईत पंजाब राज्यात निर्मित रॉयल चॅलेज व्हिस्कीचे १५ खोके, रॉयल जनरल व्हिस्कीचे ५ खोके, मध्यप्रदेश निर्मित पॉवर कुल स्ट्रॉग बियरचे ६० खोके त्याची किंमत २ लाख ७६ हजार असून वाहनासह एकूण ६ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाहन चालक मुकेश रामचंद्र सहानी (३२) रा. सुरत (गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमचे कलम ६५ (अ), (ई), ८३, ९० व १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक देविदास नेहूल करीत आहेत. संशयित सहानी याला शिरपूर न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देविदास नेहूल, दुय्यम निरीक्षक ए.सी. मानकर, बी.एस. चौथवे, के.एम. गोसावी, प्रतिकेश भामरे, अमोल धनगर, रवींद्र देसले यांच्या पथकाने केली.
दोन दिवसांपूर्वी उमर्दा व बोराडी येथे बनावट देशी दारुचे कारखाने उध्वस्त करण्यात आले होते. तालुक्यात अवैध दारू वाहतूकीने थैमान घातले आहे. मात्र प्रत्येकवेळी चालकाव्यतिरीक्त कोणावरही गुन्हा दाखल होत नाही. शेकडो गुन्ह्यांमध्ये अवैध दारू वाहतूकीचा खरा मालक कोण तेच पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला आजतागायत शोधता आलेले नाही. कारवाई होते परंतु मुख्य सूत्रधार कधीच मिळून येत नाही यामागचे गौडबंगाल जनतेला कळले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सुविधा पूर्णपणे डासळली गेल्याने प्रशासनास पत्रव्यवहार करून हि आरोग्य विभागाने झोपेचं सोंग करून संबंधितावर...
-
शिरपूर तालुक्यात बेकायदा सावकारांचा बोलबाला, झालारे झाला अखेर गुन्हा दाखल झाला..! बेकायदा सावकारांचे धाबे दणाणले, तालुक्यातील बडे मासे पोलि...
-
अमळनेर प्रतिनिधी:तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींनी नियमित सेवेत घेण्याची मागणी करत प्रशासनासह लोकप्रति...
-
मालेगाव प्रतिनिधी:-कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कर भुसे याच्या वाहनावर काही टवाळखोरांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे...
-
शिंदखेडा प्रतिनिधी:- धुळ्ळ्याकडून शिरपूर कडे जाणाऱ्या विना वाहक शिवशाही ने रात्री ८ वाजेच्या सुमारास एसटी बस क्र. एमएच ०६ बीडब्ल्यु०४०७ ला ग...
-
तरूण गर्जन रिपोट शिरसाळे येथील रवींद्र वर पोक्सो चा गुन्हा दाखल अमळनेर : पालनकर्ता बापानेच ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्...
-
नवी दिल्ली : दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होत असलेल्या ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी य...
-
शिरपूर प्रतिनिधी:-गुजरात येथून महाराष्ट्रात विदेशी मद्याची तस्करी करणारे वाहन तालुक्यातील वाघाडीनजिक जप्त करण्यात आले. या कारवाईत २ लाख ७६ ह...
-
नेमकं असं असतं का शेतकरी मित्रानो जास्त फुटवा म्हणजे जास्त उत्पन्न ही समीकरणे आज कित्येक शेतकऱ्यांच्या डोक्यात असतात पण आपण कधी खोलात जाऊन व...
-
शिंदखेडा प्रतिनिधी:- शिंदखेडा येथील विरदेल रस्त्यावर एसटी बस व ट्रकची धडक झाली. ट्रकचालक बसला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला. या धडकेत बस...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा