Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

कार चालकाची विटेने मारहाण करीत लूट.



धुळे प्रतिनिधी :- धुळे नागपूर महामार्गावरील बाळापूर शिवारात एका हॉटेलच्या बाजुला उभ्या असलेल्या कार चालकाला विटांनी मारहाण करुन त्याच्याकडील रोकड तसेच ३६ हजारांचा मोबाईल अज्ञात भामट्यांनी लांबविल्याची घटना काल पहाटे घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस महेंद्र सोनवणे हा त्याच्या ताब्यातील एमएच १९ ईजी १६७२ ही कार बाळापूर शिवारातील हॉटेल कमलेशच्या बाजुला लावून काही वेळ आराम करीत असतांना एक अनोळखी इसम तेथे आला व त्याने फिर्यादीला विटेने मारण्याचा धाक दाखवून जबरीने कारचा दरवाजा उघडण्यास भाग पाडले तसेच त्याच्या हातातील विटेने फिर्यादीच्या कंबरेला, डोक्यावर आणि मानेवर मारहाण करुन फिर्यादीच्या खिशातील तीन हजार रुपये तसेच मोबाईल असा एकूण ३९ हजारांचा ऐवज हिसकावून घेतला. याप्रकरणी अज्ञात भामट्याविरुद्ध तालुका पोलिसात फिर्याद दाखल झाली असून पुढील तपास पीएसआय कृष्णा पाटील करीत आहेत. दरम्यान,महामार्गावरील लुटीचे सत्र सुरुच असल्याने वाहन चालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध