Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरणारे मारवड पोलिसांच्या ताब्यात



अमळनेर : शेतातील ट्रॅक्टर मधून बॅटरी चोरणाऱ्या गोवर्धन येथील तिघांना मारवड पोलिसांनी अटक केली आहे.

मारवड येथील योगेश अशोक बडगुजर याच्या शेतात १५ रोजी सायंकाळी ट्रॅक्टर चे काम झाल्यानन्तर ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ सी यु २९५३ हे गावालगत शेतात लावले होते. १६ रोजी सकाळी चालक रामसिंग बारेला हा ट्रॅक्टर सुरू करायला गेला असता त्याला बॅटरी चोरी गेल्याचे निदर्शनास आले. योगेशजवळ बॅटरीची पावती नसल्याने तो पावती घेण्यासाठी अमळनेर येथील गणेश बॅटरी दुकानांवर गेला. बॅटरी चोरी लक्षात येताच दुकानदाराने योगेशला सांगितले की तीन जण रिक्षमध्ये येऊन त्यांनी तीन बॅटरी विक्रीसाठी आणल्या होत्या अशी माहिती दिली. दुकानदाराने रिक्षाचालक गणेश मुकुंदा पाटील रा धार असल्याचे सांगितले. रिक्षाचालकाने तीन जण मारवड परिसरातील सांगून त्यांना ओळखता येईल असे सांगितले.

पोलिसांनी वर्णनावरून आरोपीचा शोध घेतला असता गोवर्धन येथील राहुल सुनील पाटील वय २६ , दीपक धोंडू पारधी वय २१, जयेश गोविंदा पारधी हे तिघे बॅटरीचोर असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तिघाना अटक केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध