Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४

शिंदखेडा-खेतिया बसला ओव्हरटेकवेळी ट्रकची धडक.



शिंदखेडा प्रतिनिधी:- शिंदखेडा येथील विरदेल रस्त्यावर एसटी बस व ट्रकची धडक झाली. ट्रकचालक बसला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला. या धडकेत बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणीही प्रवासी जखमी झाले नाही. बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते. बस क्रमांक (एमएच १४ बीटी २१३६) ही बस शिंदखेड्याहून दुपारी १२.३० च्या सुमारास दोंडाईचाकडे जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने (एमएच ०९ इएम ११९४) दोंडाईचाकडे जात असताना काकाजी मंगल कार्यालयासमोर गतिरोधकाजवळ बसला ओव्हरटेकचा प्रयत्न केला. यामुळे ट्रकचा मागील भाग बसच्या ड्रायव्हर साईटच्या दर्शनी भागावर जोरदार धडकून बसच्या केबिनचा पत्रा वाकला. तसेच स्टेअरिंग वाकून व पुढचा काच फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 


यावेळी चालक विकास सोनवणे यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. बसमध्ये यावेळी सुमारे ४० प्रवासी होते. सुदैवाने कोणीही जखमी झाले नसल्याने अनर्थ टळला.यावेळी ट्रकचालक वाहनांसह दोंडाईचाच्या दिशेने पसार झाल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच शिंदखेडा पोलिस स्टेशनचे निरीक्षक बाळासाहेब थोरात घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने दोंडाईचा पोलिस
स्टेशनचे निरीक्षक किशोर परदेशी यांना दूरध्वनीवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यावेळी ट्रकचालकास बाम्हणे येथे पकडून वाहनासह शिंदखेडा पोलिस स्टेशनला जमा केले.
अपघातस्थळी साईलीला नगर येथील रहिवासी मदतीला धावून आले. बसमध्ये शालेय विद्यार्थी तसेच लग्न समारंभाला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी होती. सुदैवाने कोणालाही इजा झाली नसल्याने मोठा अनर्थ टळल्याचे प्रवाशांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध