Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ डिसेंबर, २०२४

गांधली येथे तिघांना लोखंडी रॉडने मारले


तरूण गर्जना रिपोट

एकाला सहा टाके पडले, दुसऱ्या गटातर्फेही गुन्हा दाखल

अमळनेर : रस्त्यात का उभा राहतो या कारणावरून दोघांनी तिघांना लोखंडी रॉड ने मारहाण केल्याची घटना २६ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गांधली येथे बसस्थानकावर घडली. एकाला डोक्याला गंभीर जखम झाली असून त्याला सहा टाके पडले आहेत.


गौरव रवींद्र बोरसे हा रस्त्यात उभा असताना रोहिदास खंडू पाटील याने शिवीगाळ केली. याबाबत जाब विचारण्यासाठी रवींद्र नीलकंठ बोरसे व चेतन बोरसे रोहिदास च्या घरी गेले असता त्याचा मुलगा वैभव रोहिदास पाटील याने हातातल्या लोखंडी रॉड ने डोक्यावर वार केला. भांडण आवरायला गौरव व चेतन ही मुले आली असता वैभव ने दोघांना रॉड ने मारहाण केली. रवींद्र बोरसे याला उपचारासाठी श्री ऍक्सिडंट हॉस्पिटल ला दाखल केले होते. अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून रोहिदास पाटील व वैभव पाटील यांच्या विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.

तर दुसऱ्या गतातर्फे रोहिदास पाटील यांनी फिर्याद दिली की गौरव बोरसे हा रस्त्यात उभा होता त्याला बोलायला गेलो असता त्याने पत्नीला ढकलले. आम्ही घरी निघून गेल्यानन्तर रवींद्र बोरसे , गौरव बोरसे ,चेतन बोरसे घरी आले व त्यांनी हाणामारी सुरू केली. पोटात गुप्ती घालून मारण्याची धमकी दिली.तसेच गौरव याने हातातील दगड घेऊन पोटात मारला. तिघांविरुद्ध फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध