Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४

चाकडु येथे पोल्ट्रीला गंबोरा रोगाची लागण, दिवसभरात आठशे कोंबड्या दगावल्या महीला बचत गटाचे मोठे नुकसान



शिरपुर प्रतिनिधी: तालुक्यातील चाकडु येथे पोल्ट्रीला गंबोरा आजारा प्रार्दुभाव झाल्याने दिवसभरात आठशे कोंबड्या दगावल्याने शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे द्वारा विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत  कुक्कुटपालन योजना (पोल्ट्रीफार्म) भाग्यश्री महिला बचत गट चाकडू येथिल महिला आर्थिक विकास महामंडळ धुळे द्वारा  कुकुट्टपालनासाठी शेड उभारण्यात आले आहे. 

अडीचहजार क्षमता असलेल्या या शेडमध्ये कुक्कुटपालन केले जाते. वातावरणातील अचानक बदल व अचानक झालेल्या संसर्गजन्य आजारांमुळे जवळपास आठशे कोंबड्या एकाचवेळी दगावल्याने येथिल शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर नुकसानिचा पंचनामा करुन शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्य होणे अपेक्षित आहे.कोंबड्यांना श्वसनाचा त्रासांसह विष्ठेतून, नैसर्गिक स्राव यातुन झपाट्याने संसर्ग पसरत आहे. हाच संसर्ग इतर पोल्ट्रीवर होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची गरज असुन पशुसंवर्धन विभागाने रोगांचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणुन वेळीच लसिकरणा बरोबर इतर उपाययोजना करण्याची मागणी शेतकर्‍यांकडुन करण्यात येत आहे.

अचानक झालेल्या संसर्गाने मोठ्या प्रमाणात कोंबड्या दगावल्या आहेत.सर्व प्रकारच्या लसिकरण,खाद्य व्यवस्थापन करुनही पोल्ट्रीचे नुकसान झाले आहे.पशुसंवर्धन विभागाने वेळीच खबरदारी घेऊन योग्यत्या उपाययोजना करण्याची गरज आहे.शासनाने नुकसानीचे पंचनामा करुन आर्थिक साहाय्य करावे.( सुरेखाबाई दशरथ पावरा, अध्यक्ष- भाग्यत्री महीला बचत गट चाकडु)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध