Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २५ डिसेंबर, २०२४

धुळ्यात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी; लॉजमधून चौघे ताब्यात चौघांकडे भारतातील आधारकार्ड;



धुळे प्रतिनिधी :- भारतात घुसखोरी करुन धुळे शहरात आलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना काल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. जुन्या आग्रा रोडवरील न्यु शेरेपंजाब लॉजमध्येे ते मिळून आले. त्यांच्याकडे दिल्ली, मुंबई, बंगळूरातील पत्त्याचे बनावट आधार कार्ड मिळाले आहे. विशेष म्हणजे ते नातेवाईकांशी बोलण्यासाठी आयएमओ या ऍपचा वापर करीत होते. या कारवाईमुळे शहर एकच खळबळ उडाली आहे.
महंमद मेहताब बिलाल शेख (वय ४८), शिल्पी बेगम महंमद बेताब शेख (वय ४३ रा. मानकुर इंदिरानगर, हाऊस नं.१८५, ग.नं.३, मुंबई मुळ रा. चरकंदी पो.निलुखी पोलीस ठाणे सिपचर जि.महिदीपुर, बांगलादेश), ब्युटी बेगम पोलस शेख (वय ४५ रा.ग.नं.ए/५५, पलकपुर, दिल्ली, मुळ रा. बेहेनातोला पोलीस ठाणे सिपचर, जि. महिदीपुर, बांगलादेश) व रिपा रफीक शेख (वय ३० रा.३०२, कबीर वस्ती, रोशन वाली गल्ली, दिल्ली मुळ रा. श्रीकृष्णादी पो. कबीरस्पुर पोलीस ठाणे, राजुर जि. महिदीपुर, बांगलादेश) अशी चौघांची नावे आहेत.शहरातील न्यु शेरेपंजाब लॉजमधील रूम नं.१२२ मध्ये वैध कागदपत्राशिवाय काहीजण बेकायदेशिररित्या राहत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना काल दि.२२ रोजी मिळाली होती. त्यांनी हीबाब वरिष्ठांच्या निर्दशनास आणून दिली. त्यानंतर त्यांच्या सुचनेप्रमाणे एलसीबीचे पथक, दहशतवाद विरोधी पथक व दामिनी पथकाने न्यु शेरेपंजाब लॉजमधील रुम नं.१२२ मध्ये जावुन तपासणी केली असता तेथे वरील चौघे मिळून आले. चौकशीत महंमद शेख व शिल्पी बेगम यांनी आम्ही पती-पत्नी व दुसरी महिला ही मुबोली बहिणी असून चारही बांगलादेशी असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून ४० हजाराचे चार मोबाईल ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे बांगलादेशी असल्याचे कोणतेही वैध पासपोर्ट व व्हिसा आढळुन आलेला नाहीत. त्यांचे नातेवाईकांशी बोलण्याकरिता आयएमओ हे ऍप वापरत होते.

याप्रकरणी एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांच्या फिर्यादीवरून वरील चारही बांगलादेशींविरुध्द आझादनगर पोलीस ठाण्यात पारपत्र (भारतात प्रवेश नियम १९५० कलम ३ सह ६, परकीय नागरीक आदेश १९४८ परिच्छेद ३ (१), परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ व भारतीय न्याय संहिता-२०२३ चे कलम ३(५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि श्रीकृष्ण पारधी, पोसई प्रकाश पाटील, पोहेकॉ मुकेश पवार, शशिकांत देवरे, हेमंत पाटील, पोना धमेंद्र मोहिते, पोकॉ. सुशिल शेंडे, निलेश पोतदार, विनायक खैरनार, किशोर पाटील, ए.टी.एस.चे असई रफीक पठाण, दामिनी पथकाचे महिला पोकॉ. धनश्री मोरे, आझादनगर पोलीस ठाण्याच्या महिला पोसई राजश्री पाटील, पोकॉ. बेबी मोरे व वंदना कासवे यांनी केली आहे.

बेरोजगारीला कंटाळुन घुसखोरी- पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये महंमद शेख व शिल्पी बेगम हे पती-पत्नी व सोबत असलेल्या दोन्ही महिला या मानलेल्या बहिणी असल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले. तसेच आम्ही चौघे बांगलादेशी नागरिक असून बेरोजगारीला कंटाळून भारतात घुसखोरीच्या मार्गाने प्रवेश केला. धुळे शहरातील शेर पंजाब हॉटेलमध्ये राहुन धुळ्यात मिळेल त्या ठिकाणी कामधंदा करून कायम राहण्यासाठी आम्ही घराचा शोध घेत असल्याची कबूली देखील त्यांनी दिली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध