Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

परभणीतील घटनेचा निषेध विविध संघटनांच्या वतीने निवेदन



अमळनेर प्रतिनिधी : परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करण्याच्या प्रयत्न करण्याऱ्याला दोषींवर कारवाई करावी आणि पोलिस प्रशासना कडून राबविण्यात येणारे कोबिंग ऑपरेशन तत्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी अमळनेर शहरात सर्व समाज बांधव , वंचित बहुजन आघाडी , भीम आर्मी, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद अशा विविध संघटनाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात  म्हंटले आहे की भारतीय संविधान या राष्ट्रीय ग्रंथाचा अवमान करणाऱ्या अतिशय घाणेरड्या मनोविकृतीचा मानसिकतेचा आम्ही समस्त अमळनेरचे दक्ष व जागरूक नागरिक अत्यंत तीव्र निषेध करतो व दोषीवर कठोर कारवाई करून देशद्रोह्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे. असे ह्या निवेदनात म्हंटले आहे ह्या वेळी विशाल सोनवणे, गौतम बि-हाडे, बाळासाहेब संदानशिव, अर्जुन संदानशिव, राहुल बि-हाडे,मनोज शिंगाने, गौरव सोनवणे,नवीन शेख,समाधान बि-हाडे, सोनू बि-हाडे,दर्शन बि-हाडे, अक्षय सोनवणे, अजय बि-हाडे,सागर पाटील,अनिकेत बि-हाडे,ओम बि-हाडे, भूपेंद्र शिरसाठ,पवन बि-हाडे, चंद्रकांत संदानशीव, नरेंद्र संदानशीव, विनोद बिऱ्हाडे , सोमचंद संदानशीव , बाळासाहेब संदानशीव विशाल बिऱ्हाडे, भीमराव वानखेडे ,पंकज वानखेडे , सचिन अहिरे ,मायाताई सैंदाने , मुकेश मैराळे यांच्यासह सर्व युवक आणि सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध