Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २३ डिसेंबर, २०२४

गोराणे फाट्याजवळ शिवशाही बसला आग - बस जळून खाक प्रवाशाना सुखरूप वाचविण्यात यश...!



शिंदखेडा प्रतिनिधी:- धुळ्ळ्याकडून शिरपूर कडे जाणाऱ्या विना वाहक शिवशाही ने रात्री ८ वाजेच्या सुमारास एसटी बस क्र. एमएच ०६ बीडब्ल्यु०४०७ ला गोराने फाट्याजवडील हॉटेल सुवर्णनगरी येथे गाडीचा मागचा टायर फुटल्याने टायरने आग पकडल्यामुळे बसने पेट घेतला. बस चालक प्रदीप भरतसिंग पवार यांच्या सतक्र्तेमुळे प्रवाशांच्या जीव वाचला. यात सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. या भीषण अपघातामुळे बसचे संपूर्ण नुकसान झाले आहे. गाडीतील सर्व सीट सह संपूर्ण गाडी जळुन खाक झाली आहे.


याबाबत स्थानिक लोकांना कळतच त्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना मदत केली तसेच जिंदाल पावर पॉइंट या कंपनीच्या अग्निशामक दलाशी संपर्क साधल्याने तेही घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण
मिळवले. घटनेची माहीती नरडाणा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना कळताच ते पीएसआय मनोज कुवर व कर्मचारी सह घटनास्थळी हजर झाले.

यावेळी एसटी महामंडळाचे व्यवस्थापक शिवदे, धुळे आगाराचे व्यवस्थापक मनोज पवार, शिरपूर येथील अनुराधा चौरे हे घटनास्थळी उपस्थित झाले.

गोराणे फाटा येथील तसेच गावातील नागरिकांच्या सदरतेमुळे मोठी जीवित हानी टळली

पुढील तपास नरडाणा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध