Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, २१ डिसेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
साक्री पंचायत समिती कार्यालयासमोर आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराविरोधात अर्धनग्न आंदोलनाला यश धुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर आदोलन स्थगित
साक्री पंचायत समिती कार्यालयासमोर आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराविरोधात अर्धनग्न आंदोलनाला यश धुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर आदोलन स्थगित
साक्री तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सुविधा पूर्णपणे डासळली गेल्याने प्रशासनास पत्रव्यवहार करून हि आरोग्य विभागाने झोपेचं सोंग करून संबंधितावर कारवाई न करता दुर्लक्ष केल्याने दि.१९ डिसेंबर बुधवारी रोजी पासून पंचायत समिती कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते कैलास मोठा भाऊ भदाणे व पत्रकार उमाकांत लक्ष्मण अहिरराव यांच्या वतीने अर्धनग्न आंदोलन छेडण्यात आले होते.
आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी वर्ग क/ ड अनेक ठिकाणी मुख्यालयात न राहता बाहेरगाव ये-जा करत असतात,तरीही शासनाकडून घर भाडे भत्ता घेत असून अशा कर्मचाऱ्या विरोधात अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. सन २०१९ पासून जे कर्मचारी मुख्यालयात राहत नाही घरभाडे भत्ता व इतर भत्ता बिनधास्तपणे घेत असून तात्काळ अशा कर्मचाऱ्यांकडून घर भाडे भत्ता बसूल करण्यात यावा व योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशा विविध मागण्या
संदर्भात अर्धनग्न आंदोलन दि.१९ डिसेंबर रोजी पासून पंचायत समिती कार्यालया समोर आंदोलन करण्यात होते या आंदोलनात खालील मागण्या करण्यात आल्या होत्या, मागण्या : १) तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, साक्री यांना आरोग्य अधिकारी, कर्मचारी मुख्यालय राहत नाही या विषयी सादर केलेला अहवालानुसार अशा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.
२) शासनाच्या परिपत्रकाचे उल्लंघन करीत असलेल्या आरोग्य अधिकारी,कर्मचारी यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी. ३) शासन परिपत्रकाचे उल्लंघन करून मुख्यालय राहत असल्याबाबतचे खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. ४) सन २०१९ पासून आजपर्यंत आरोग्य कर्मचारी मुख्यालय न राहता घर भाडे भत्ता व
इतर भत्ताचा लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून व्याजासह वसुली करून शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात यावा.५) साक्री तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांनी २४ तास अविरतपणे सेवा देणे अभिप्रेत असले तरी प्रत्यक्षात तालुक्यातील ६० टक्के उपकेंद्रे बंद अवस्थेत असतात.तसेच काही अधिकारी व कर्मचारी फक्त उपकेंद्रात पाच ते सहा तासच उपस्थित असतात. अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करून सेवा पुस्तकात नोंद करण्यात यावी. या आंदोलनाला बाळू साळुंके,चंद्रशेखर अहिरराव प्रवीण काकुस्ते योगेश जाधव,सोमसिंग राजपूत,तोताराम बहिरम, कृष्णा चौरे,अरुण ठाकरे, नानाजी शेलार,राहुल गवळे,प्रदीप सोनवणे आदींनी पाठिंबा दर्शवित उपस्थित राहून आंदोलनात सहभागी झाले होते. शेवटी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी,तालुका आरोग्य
अधिकारी यांनी दखल घेतली
व दि.२० डिसेंबर शुक्रवारी रोजी प्रशासनाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन बोडके यांनी दुपारी आंदोलनकर्त्यांची भेट घेत लेखी आश्वासन दिले त्या लेखी आश्वासनमध्ये सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या मुख्यालयात राहून वैद्यकीय व आरोग्य सेवा अखंडपणे पुरविण्यात यावी, मुख्यालयात विनाअनुमती अनुपस्थितीत राहणाऱ्या, मुख्यालयात वास्तव्यास न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचारी- यांची नावे या कार्यालयात दरमहा कळविण्यात यावीत,याबाबत उक्त संदर्भ क्रमांक ३ व ४ अन्वये तालुका आरोग्य अधिकारी यांना कळविण्यात आलेले आहे.
जे अधिकारी / कर्मचारी मुख्यालयी राहणार नाहीत त्यांचा घरभाडे भत्ता तात्काळ बंद करून त्यांचेवर प्रशासकीय कारवाई करणेबाबत प्रस्ताव सादर करणेबाबत कळविण्यात आलेले आहे.जे वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत नाही त्यांचा घरभाडे भत्ता माहे डिसेबर २०२४ पेड इन जानेवारी २०२५ चे मासिक वेतनापासून
बंद करण्यात यावा,तसेच जिल्हास्तरावरून मुख्यालयीन न राहणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांचेवर कारवाई करणेबाबत भरारी पथकावी नियुक्ती करण्यात आलेली आहे.व भरारी पथकाच्या भेटीत मुख्यालयी न राहणारे अधिकारी / कर्मचारी यांच्यावर घरभाडे भत्ता बसुली बाबत व म.ना.से (वर्तणुक) नियम १९७९ आणि म.जि.प.जि. से (वर्तणुक) नियम १९६७ नुसार शास्ती विषयक कार्यवाही करण्यात येईल.
तसेच सर्व अधिकारी / कर्मचारी मुख्यालयी राहून आरोग्य सेवा व वैद्यकीय सेवा पुरवतील याबाबत या कार्यालयाकडून दक्षता घेण्यात येईल असे लेखी पत्रात नमुद करण्यात आलेले आहे.
या वेळी कैलास भदाणे,(पत्रकार)उमाकांत अहिरराव,खुडाणेचे सरपंच राहुल इंगळे,नाना शेलार,बासखेडीचे सरपंच दिपक जाधव,राजेंद्र कारंडे,प्रदीप सोनवणे,मुना अहिरराव,जयेश बुवा.साक्री तालुकाध्यक्ष शिवसेना (शिंदे गट) पंकज मराठे,प.स.सदस्य महाबीर जैन,बाळा शिंदे,माऊली म्हसदी आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर तालुक्यात बेकायदा सावकारांचा बोलबाला, झालारे झाला अखेर गुन्हा दाखल झाला..! बेकायदा सावकारांचे धाबे दणाणले, तालुक्यातील बडे मासे पोलि...
-
मालेगाव प्रतिनिधी:-कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कर भुसे याच्या वाहनावर काही टवाळखोरांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे...
-
शेतकरी वृद्ध असल्याने सुदैवाने बचावला अमळनेर : पाणी पिण्यासाठी पांझरा नदीत बैलांनी बैलगाडीसह धाव घेतली आणि वालखेडा येथील कोल्हापूर ब...
-
नेमकं असं असतं का शेतकरी मित्रानो जास्त फुटवा म्हणजे जास्त उत्पन्न ही समीकरणे आज कित्येक शेतकऱ्यांच्या डोक्यात असतात पण आपण कधी खोलात जाऊन व...
-
दै. तरूण गर्जना रिपोट भाऊबीजेच्या दिवशी तापी नदीत उडी मारून केली होती आत्महत्या अमळनेर : चारित्र्याचा संशय घेतल्याने पती नणंदेच्या जाचाला ...
-
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे लोक वर्गणी रद्दबातल व पाणीपट्टी वर व्याज आकारणी करू नये याबद्दल अमळनेर नगर परिषदे कडे जोरदार मागणी *...
-
साक्री तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सुविधा पूर्णपणे डासळली गेल्याने प्रशासनास पत्रव्यवहार करून हि आरोग्य विभागाने झोपेचं सोंग करून संबंधितावर...
-
शिंदखेडा प्रतिनिधी:- धुळ्ळ्याकडून शिरपूर कडे जाणाऱ्या विना वाहक शिवशाही ने रात्री ८ वाजेच्या सुमारास एसटी बस क्र. एमएच ०६ बीडब्ल्यु०४०७ ला ग...
-
अमळनेर प्रतिनिधी:तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींनी नियमित सेवेत घेण्याची मागणी करत प्रशासनासह लोकप्रति...
-
नवी दिल्ली : दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होत असलेल्या ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा