Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

अंत्योदय आणि प्रधान्यकार्ड लाभार्थ्यांनी ३१ पर्यंत केवायसी करणे आवश्यक

   

केवायसी न झाल्यास लाभ मिळण्यास तांत्रिक अडचण येऊ शकते

अमळनेर : अंत्योदय आणि प्राधान्य कार्ड लाभार्थ्यांनी ३१ डिसेम्बर पर्यंत स्वतःचे आणि संपूर्ण कुटुंबाचे के वाय सी करून घ्यावे अन्यथा धान्य मिळण्यास तांत्रिक अडचण निर्माण होऊ शकते असे आवाहन महसूल विभागातर्फे  करण्यात आले आहे.

अमळनेर तालुक्यात अंत्योदय कार्ड ९ हजार ६ असून एकूण लाभार्थी ३५ हजार ८१६  आहेत. तर प्राधान्य कार्ड ४३ हजार ९१६ असून एकूण लाभार्थी १ लाख ७८ हजार ७४९ आहेत. शासनाच्या निर्देशानुसार सर्व लाभार्थ्यांना केवायसी करणे आवश्यक आहे. 

लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व कुटुंबाचे देखील आधार कार्ड सोबत नेऊन स्वस्त धान्य दुकानदाराकडे जायचे आहे. तेथे पॉस मशीनवर अंगठा देऊन प्रत्येकाचे केवायसी करून घ्यावे. प्रत्येक सदस्याला आधार कार्ड घेऊन समक्ष जावे लागणार आहे. असे आवाहन पुरवठा निरीक्षक रुकसाना शेख यांनी केले आहे. 

दरम्यान स्वस्त धान्य दुकानदारांचे पॉस मशीन गेल्या १५ दिवसापासून बंद होते. नुकतेच १४ तारखेला ते सुरू झाले आहेत. के वाय सी करण्यासाठी ३१ डिसेम्बर अंतिम मुदत आहे. मुदत वाढवून देण्याची मागणी सर्वत्र होत आहे. प्रत्येक लाभार्थी नागरिकाने मुदतीत केवायसी करून घेणे आवश्यक आहे. केवायसी न झाल्यास भविष्यात तांत्रिक अडचणीमुळे मोफत व स्वस्त मिळणारे धान्यापासून लाभार्थी वंचित राहू शकतात.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध