Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १४ डिसेंबर, २०२४

परभणी जिल्हातील घटने बाबत तात्काळ कार्यवाही करा अन्यथा कापडणे परिसर अन्याय अत्यांचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने देवभाने फाट्यावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा.....



धुळे प्रतिनिधी :- परभणी जिल्हात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांच्या स्मारकासह संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाजकंटकांच्या वतीने नास ढूस करण्यात आली होती त्याला तिथेच परिसरात काही भीम सैनिकांनि चोप देत पोलिसांच्या स्वाधीन गेले त्यानंतर घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे शहरासह जिल्ह्याबाहेर सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरू लागल्याने शहरात भीमसैनिकांनी एकत्र भव्य मोर्चा काढत कडकडीत बंदची हाक दिली, याच मोर्चा दरम्यान काही आक्रमक भिमसैनिकांसह बाहेरील काही समाजकंटकांनं कडुनं जाळपोळ करत वाहणाची ही तोडफोड करण्यात आली, तसेंच सदर प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात पोचल्याने महाराष्ट्रातील भीमसैनिकांचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. 

म्हणून हा प्रकार घडू नये या संदर्भात धुळे जिल्ह्यातील कापडणे परिसरातील तरुणांनी एकत्रित  कापडणे परिसर  अन्याय अत्याचार निर्मूलन संघर्ष समिती स्थापन करीत त्या माध्यमातून सोनगीर पोलीस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.सचिन कापडणीस साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे, या निवेदनात म्हटले आहे की  सदर घटनेतील अटक असलेल्या आरोपीची कसून चौकशी करत या घटने मागील मास्टर माईंड कोण..? याचा 48 तासाच्या आत शोध घेऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा  कापडणे परिसर अन्याय अत्याचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने देवभाने फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल तसेच होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा  यावेळी देण्यात आला आहे.

निवेदन स्वीकारताना सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. सचिन कापडणीस साहेब, तसेच निवेदन देताना साप्ताहिक सामान्य लोकनजर चे संपादक समाधान सुनील देवरे, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल भामरे, भूषण ब्राह्मणे, रमेश भामरे, विनोद भामरे, सिद्धार्थ बागुल, सिद्धार्थ शिंदे, कमलेश भामरे, विनोद मधुकर भामरे, मयूर संजय भामरे, आकाश भामरे सिद्धार्थ शिरसाठ, राकेश निकम, किरण देवरे, जितेंद्र चव्हाण, राहुल पांचाळ, उमेश शिलावट शाहरुख पिंजारी, भगवत धिवरे, सागर पारधी, अश ब्राह्मने, सह मोठ्या संख्येने बहुजन समाज व भीमसैनिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध