Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४

पत्रकार डॉ विजय गाढे हे "डॉ बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित



अमळनेर : प्रा डॉ विजय गाढे यांना दिल्ली येथील अखिल भारतीय साहित्य अकादमीने या वर्षांचा खान्देशातून "डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप -2024" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ‌.

अखिल भारतीय साहित्य अकादमी,दिल्ली चे ४० वे राष्ट्रीय संमेलन दि. ८ व ९ डिसेंबर २०२४ रोजी नवी दिल्ली येथे पार पडले.
यावेळी मंचावर राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर एस.पी सुमनाक्षर, राष्ट्रीय महासचिव जय सुमनाक्षर, प्रोफेसर रतन लाल सोनागरा (अध्यक्ष स्वागत समिती), तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी तथा माजी मंत्री संघप्रिय गौतमजी यासह अनेक आजी, माजी मंत्री उपस्थित होते.
त्यांनीं हा पुरस्कार आपले आई कालकथीत तुळसाबाई व वडील कालकथीत शालिग्राम यांना समर्पित केला.
प्रा डॉ विजय गाढे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने संपादक मनोज बारी, उप संपादक सुनील भावसार,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री वसंत मुंडे,महासचिव डॉ विश्वास आरोटे,राज्यध्यक्ष प्रवीण सपकाळे,खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायासाकड,अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान मैराळे, साहित्य अकादमीचे जिल्हाउपाध्यक्ष चिंधु वानखेडे या सह समाजातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी केले असून त्यांच्या वर सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध