Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४

जुन व ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत प्राप्त




30 गावातील शेतकऱ्यांना मिळणार पावणे सात कोटींची मदत- आ.अनिल पाटील

अमळनेर - तालुक्यात जुन व ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत प्राप्त झाली असून तालुक्यातील एकूण
30 गावातील शेतकऱ्यांना पावणे सात कोटींची मदत मिळणार असल्याची माहिती आ.अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
       या मदती संदर्भात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. यावर्षी
जून व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अमळनेर तालुक्यातील पातोडा परिसरातील 18 गावे व शिरुड मंडळातील 14 गावातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर वरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते.सदर नुकसानीचा तत्कालीन मंत्री अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार तातडीने पंचनामा होऊन मदतीसाठी प्रस्ताव शासन दरबारी सादर  करण्यात आला होता, त्यावेळी अनिल पाटील हे स्वतः मदत व पुनर्वसन मंत्री असल्याने त्यांनी शेतकऱ्यांचा हा विषय गांभीर्याने घेत संपूर्ण राज्यातील बाधित शेतकरी बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.अखेर नुकतीच शासनाने ही मदत मंजूर केली असून लवकरच ही रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे.

जून 2024 मधील बाधीत गावे

    जून 2024 मध्ये शिरूड मंडळातील  खडके, जवखेडे, पिंपळे बु, शिरुड, इंद्रापिंप्री, डांगर बू, रणाईचे बु., अंचलवाडी, रनाईचे खुर्द, लोंढवे, निसर्डी,वाघोदा आदी
12 गावातील शेतकऱ्यांना 1कोटी 55 लक्ष,14 हजार 386 एवढी मदत मिळणार आहे.

ऑगस्ट 2024 मधील बाधीत गावे

    ऑगस्ट 2024 मध्ये बाधीत झालेल्या पातोंडा परिसरातील पातोंडा, नांद्री, खवशी बु., दापोरी बु., धावडे, धुरखेडा, कामतवाडी, मुंगसे, दापारी खु., रुंधाटी, मठगव्हाण, नालखेडा, गंगापूरी, खापरखेडा प्र. ज, जळोद, खेडी खु.प्र.ज, खेडीसिम प्र.ज आदी 18 गावातील शेतकऱ्यांना 5 कोटी, 28  लक्ष, 63 हजार 28 एवढी मदत मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध