Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, १८ डिसेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
भिकाऱ्यांना भीक दिल्यास होणार गुन्हा दाखल, देशात 'या' शहरांमध्ये 1 जानेवारीपासून होणार कडक कारवाई
भिकाऱ्यांना भीक दिल्यास होणार गुन्हा दाखल, देशात 'या' शहरांमध्ये 1 जानेवारीपासून होणार कडक कारवाई
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाकडून देशातील ३० शहरं भिकारीमुक्त बनवण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. यासाठी एक पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असून देशातील ३० शहरात ते राबवला जात आहे. नव्या वर्षात पहिल्या दिवसापासून निवडक ३० शहरांमध्ये भिकाऱ्यांना भीक देणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळं असलेल्या शहरांचा यामध्ये समावेश आहे.
ऐतिहासिक स्थळांमध्ये इंदौरचा समावेश असून १ जानेवारीपासून शहरात भिकाऱ्यांना भीक देणाऱ्यांवर एफआयआर दाखल केली जाणार आहे. जिल्हाधिकारी आशीष सिंह यांनी सांगितलं की, इंदौरमध्ये भीक मागण्यावर बंदी घालण्याचा आदेश आधीच जारी करण्यात आला आहे.
भीक मागण्याविरोधात आमची जनजागृती मोहिम डिसेंबर अखेरपर्यंत शहरात सुरू राहील. जर एखादी व्यक्ती १ जानेवारीपासून भीक देताना आढळली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. इंदौरमधील सर्व लोकांना आवाहन आहे की त्यांनी लोकांना भीक देऊ नये असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.
प्रशासनाने गेल्या काही महिन्यात लोकांना भीक मागण्यासाठी भाग पाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. भीक मागणाऱ्या अनेक लोकांचे पुनर्वसनही केलं असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.
इंदौरसह देशातील ३० शहरे भिकारी मुक्त बनवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. इंदौरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये १४ भिकाऱ्यांना पकडण्यात आलं होतं. एका महिलेकडे ७५ हजार रुपये सापडले होते. तिने फक्त १० ते १२ दिवसात इतके पैसे गोळा केले होते. शहरात काही अशी कुटुंबे आहेत जी सतत पकडल्यानंतरही पुन्हा पुन्हा भीक मागत आहेत. त्यांच्यावर करडी नजर असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
धार्मिक महत्त्व असलेल्या अयोध्या, ओंकारेशवर, कांगडा, सोमनाथ, उज्जैन, बोधगया, त्र्यंबकेश्वर, पावागढ, मुदैर आणि गुवाहाटी या शहरांमध्ये भिकारीमुक्त अभियान सुरू केलं आहे. याशिवाय पर्यटन स्थळांमध्ये जैसलमेर, तिरुवनंतपुरम, विजयवाडा, कुशीनगर, सांची, केवडिया, श्रीनगर, नामसाई, खुजराहो आणि पाँडिचेरीचा समावेश आहे. तर ऐतिहासिक शहरांमध्ये वारंगल, तेजपूर, कोझिकोड, अमृतसर, उदयपूर, कटक, इंदौर, म्हैसूर, पंचकुला, शिमला आणि तेजपूर या शहरांचा समावेश आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर तालुक्यात बेकायदा सावकारांचा बोलबाला, झालारे झाला अखेर गुन्हा दाखल झाला..! बेकायदा सावकारांचे धाबे दणाणले, तालुक्यातील बडे मासे पोलि...
-
मालेगाव प्रतिनिधी:-कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कर भुसे याच्या वाहनावर काही टवाळखोरांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे...
-
शेतकरी वृद्ध असल्याने सुदैवाने बचावला अमळनेर : पाणी पिण्यासाठी पांझरा नदीत बैलांनी बैलगाडीसह धाव घेतली आणि वालखेडा येथील कोल्हापूर ब...
-
नेमकं असं असतं का शेतकरी मित्रानो जास्त फुटवा म्हणजे जास्त उत्पन्न ही समीकरणे आज कित्येक शेतकऱ्यांच्या डोक्यात असतात पण आपण कधी खोलात जाऊन व...
-
दै. तरूण गर्जना रिपोट भाऊबीजेच्या दिवशी तापी नदीत उडी मारून केली होती आत्महत्या अमळनेर : चारित्र्याचा संशय घेतल्याने पती नणंदेच्या जाचाला ...
-
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे लोक वर्गणी रद्दबातल व पाणीपट्टी वर व्याज आकारणी करू नये याबद्दल अमळनेर नगर परिषदे कडे जोरदार मागणी *...
-
साक्री तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सुविधा पूर्णपणे डासळली गेल्याने प्रशासनास पत्रव्यवहार करून हि आरोग्य विभागाने झोपेचं सोंग करून संबंधितावर...
-
शिंदखेडा प्रतिनिधी:- धुळ्ळ्याकडून शिरपूर कडे जाणाऱ्या विना वाहक शिवशाही ने रात्री ८ वाजेच्या सुमारास एसटी बस क्र. एमएच ०६ बीडब्ल्यु०४०७ ला ग...
-
अमळनेर प्रतिनिधी:तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींनी नियमित सेवेत घेण्याची मागणी करत प्रशासनासह लोकप्रति...
-
नवी दिल्ली : दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होत असलेल्या ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा