Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
सामाजिकतेचा स्पर्श आणि जनतेविषयी असलेली बांधीलकी याचा सुरेख संगम म्हणजेच " शामकांत रघुनाथ सनेर "
सामाजिकतेचा स्पर्श आणि जनतेविषयी असलेली बांधीलकी याचा सुरेख संगम म्हणजेच " शामकांत रघुनाथ सनेर "
शिंदखेडा प्रतिनिधी :- विधानसभेच्या निवडणुकीत आता प्रचाराला रंग चढू लागला आहे आरोप,प्रत्यारोप च्या फैरी झाडल्या जात असतांना ढोलताशांच्या गजरात उमेदवारांच्या मिरवणूका गावागावात काढल्या जात आहे प्रचारात सहभागी होण्यासाठी बेरोजगारांना रोजगार आणि महिलांना काम मिळू लागले आहे यंदा रोजगारांची दिवाळी आणि उमेदवारांची दिवाळे एकाचवेळी साजरी होतांना आपण पहात आहोत, निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत एकीकडे उमेदवारांच्या भूतकाळाची उजाळणी आणि ओवाळणी एकाच वेळी होतांना एकमेकांवर शब्दांची उधळण करत उमेदवार आपल्या मतांची बेगमी करतानाचे चित्र निर्माण झाले आहे,
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभेच्या निवडणुकीत याचा अनुभव मतदारांना पहावयास मिळतोय, शिंदखेडा मतदारसंघात महायुतीचे जयकुमार रावल,महाविकास आघाडी चे संदीप बेडसे आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार शाम सनेर यांच्यात होत असलेल्या संघर्षाच्या कथा रंगवताना गांवकरी गांव चावडीवर दिसत आहेत, शिंदखेडा विधानसभेच्या निवडणुकीत कोणाचे खोके, तर कोणाचे झेंडे, तर कोणाचे भोंगें अशी चुरशीची तिरंगी लढत वेगळ्या वळणार येत वातावरण तापत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत,शाम सनेर यांची कोणतीच राजकीय पार्श्वभूमी पाठीशी नसतांना किंवा शाम सनेर हे तीन पिढ्यांचे राजकीय वारसदार ही नाहीत, शाम सनेर जनतेचे वारसदार म्हणून राजकीय क्षितीजावर चमकणारे तारे आहेत, शाम सनेरांचा जन्म ना गढी वर झाला, ना माढी वर झाला शाम सनेरांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला आणि संघर्ष योध्दा म्हणून त्यांची " ओळख " झाली ! शिंदखेडा तालुक्यांत अतिवृष्टी, गारपीट ने शेतातील पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर भल्या पहाटे सर्व प्रथम पोहचणारे शिंदखेडा विधानसभेचे शाम सनेर एकमेव उमेदवार आहेत,शाम सनेरांनी युवक बिरादरी सामाजिक संघटनेत समाजसेवेची बांधिलकी जपत काँग्रेस सेवादलाच्या माध्यमातून राजकारणाच्या मैदानात उतरले, नंतरच्या काळात शाम सनेरांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात चमकदार कामगिरी केल्याबद्दल अगदी कमी वयात काँग्रेस ने शाम सनेरांवर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली, काँग्रेस पक्षाची डागडुजी आणि उभारणी करतांना अनेक अडथळे पार करत आलेल्या विपरीत परिस्थितीशी तोंड देत, ना डगमगता आपलं अध्यक्ष पद शाम सनेरांना सिध्द करावे लागले, शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी शेतमजूरांचे प्रश्न सरकार दरबारी भांडून अवकाळी पाऊस अणि अतीवृष्टीने झालेल्या पिकांचे नुकसान भरपाईचे, सरकार शी भांडून पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून दिलेत, शाम सनेरांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सरकारशी असलेला संघर्ष सुरुच आहे,तो संपलेला नाही ,शेतकरी शेतमजूरांचे आणि तरुण, आबालवृद्धांच्या प्रश्नां साठी मुख्यमंत्र्यांची, मंत्री यांच्या गाड्या अडवतांना सरकारी पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालतांना शाम सनेरांना आपण अनेकवेळा पाहिले असेल, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रसंगी शाम सनेरांनी रस्त्यावर उतरून आदोलने केली आहेत, सामाजिकतेचा स्पर्श आणि जनतेविषयी असलेली बांधीलकी याचा सुरेख संगम म्हणजेच " शामकांत रघुनाथ सनेर " आपली उमेदीची ३५वर्ष शाम सनेरांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी घालविली, कधी जनतेच्या पाठीशी तर कधी जनता शाम सनेरांच्या पाठीशी असा ३५ वर्षाचा पाठशिवणीचा प्रवास न थकता न थांबता ,ऊन पाऊस वारा अंगावर घेत अखंडपणे चालूच आहे.
युवक बिरादरी च्या सामाजिक संघटने चा वारसा आणि काँग्रेस सेवादलाची शिकवण यांच्या माध्यमातून शाम सनेरांचा राजकीय प्रवास जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र सुरू असतांनाच आपण केलेल्या कार्याचे मोजमाप आजमावण्यासाठी शाम सनेर शिंदखेडा विधानसभेच्या निवडणुकीत "रिक्शा" हे चिन्ह घेऊन मैदानात उतरले आहेत, शिंदखेडा या आपल्या कर्म भूमीच्या ग्राउंड वर विजयाचा षटकार ठोकण्यासाठी शाम सनेर सज्ज झाले आहेत, शेतकऱ्यांच्या बांधावर भल्या पहाटे जाऊन पोचणारे शाम सनेर शिंदखेडा विधानसभेच्या निवडणुकीतील एकमेव उमेदवार आहेत, शिंदखेडा तालुक्यातील जनतेचे शाम सनेर सालदार, आणि चौकीदार आहेच,पण शाम सनेर शिंदखेडा विधानसभेचे उमेदवार सुध्दा आहेत, शाम सनेरांना जनतेने कामाच्या रुपाने स्विकारले आहेच पण रिक्शा या चिन्हावर २०तारीखेच्या मुहूर्तावर शिक्का मारुन विधिमंडळात शिंदखेडा तालुक्याचे आमदार म्हणून ही जनतेला पहावयाचे आहे त्या साठी जनता सज्ज झाली आहे!!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
माजी आमदार शिरीष दादा चौधरी प्रत्येक नागरिकाच्या आवाजाची महत्त्वाची भूमिका बजावणारा नेता आहे. अमळनेर तालुक्यातील नेत्यांमध्ये, शिरीष दाद...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
-
डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास अनेक स्थानिक प्रश्न लागणार मार्गी:- मगन भाऊसाहेब, अमळनेर:- मागील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे निम-कळमसरे परि...
-
अमळनेर : समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने पारोळ्याच्या एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अमळनेर पारोळा रस्त्यावर जिनिंग जवळ ९ रो...
-
अमळनेर- विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील सुमारे 42 गावात भरगच्च विकास कामांमुळे मंत्री अनिल पाटील यांनाच साथ मिळणार असा दावा ...
-
घरमालक कुटुंबाच्या चारही जणाविरुद्ध गुन्हा दाखल अमळनेर : घर खाली करण्यावरून वाद होऊन घरमालकाच्या कुटुंबाने भाडेकरूंच्या कुटुंबाल...
-
अमळनेर : ट्रॅक्टरची माहिती तलाठी व पोलिसांना देतो म्हणून कळमसऱ्याच्या तिघांनी तांदळी येथील एकाला चाकूने व इतर दोघांना चापटा बुक्क्य...
-
अमळनेर : तालुक्यातील चोपडाई कोंढावळ येथील एसएसटी पथकाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कार मधून सुमारे ४५ हजाराचा गुटखा आणि तंबाखू जप्त...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा