Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४
पोटात आणि ओठात एकच असणारा साधा माणूस म्हणजे डॉ अनिल शिंदे- बाळासाहेब थोरात
अमळनेर : लाडक्या बहिणीला जेव्हढे पैसे दिले त्यापेक्षा जास्त पैसे जाहिरातीवर खर्च झाला आहे. म्हणून महायुतीचे भ्रष्ट सरकार आपल्याला घालवायचे आहे असे आवाहन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमळनेर येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात केले.
विद्यमान मंत्री अनिल पाटील यांचे नाव न घेता ते म्हणाले की विरोधी उमेदवार काय आहे हे मला सांगण्याची गरज नाही. गडी आमदार झाला आणि सहा महिन्यात अप्रिय का झाला हे कळलेच नाही. निवडून आलो म्हणजे तुम्ही लोकांचे बॉस झाला असे नाही. लोक आपले गुलाम नाहीत , लोकांचे ऐकून घेतले तर त्यांचे दुःख कमी होते. डॉ अनिल शिंदे असा माणूस आहे की त्याच्या पोटात आणि ओठात एकच असते. महाविकास आघाडीची उमेदवारी मागणारे सर्व इच्छुक आज व्यासपीठावर येऊन डॉ शिंदे यांच्या पाठीशी आहेत याचा मला आनन्द आहे.
यावेळी प्रतिभा शिंदे म्हणाल्या की , अडीच वर्षात महाराष्ट्र धर्म नासवला आहे त्याचा बदला तुम्हाला घ्यायचा आहे. अमळनेरचा आमदार प्रतोद होता म्हणून याच्या गद्दारीमुळे पक्ष फुटला सर्व पदे आमदारांच्या घरात आहेत. शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्याला धडा शिकवण्यासाठी डॉ अनिल शिंदे यांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले. ऍड ललिता पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडू नका , हेवेदावे करू नका , नतभ्रष्टता करू नका मागच्या दोन वेळेस यामुळेच जागा गमावल्या आता सर्व एकत्र येऊन महाविकास आघाडीची ताकद दाखवू. उमेदवार डॉ अनिल शिंदे यांनी आपल्या भाषणातून मी उच्च शिक्षित असल्याने मला आघाडीने उमेदवारी दिली आहे. मी उत्कृष्ट सर्जन आहे मी विरोधकांची अशी सर्जरी करेल की त्यांना घरी पाठवेल.
यावेळी सदाभाऊ खोत व सुजय विखे पाटील यांचा निषेध करण्यात आला. मेळाव्याचे सूत्रसंचालन संदीप घोरपडे यांनी केले.
पत्रकार परिषद
मेळाव्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली. महाविकास आघाडीने पंचसूत्री दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडी सत्तेवर असताना आपण जुनी पेन्शन बंद केली त्याबद्दल काय वाटते यावर त्यांनी हा मुद्दा यंदा अजेंड्यावर घेतला आहे. एकीकडे आघाडी लाडकी बहीण योजनेवर टीका करते आणि दुसरीकडे अनुदान वाढवण्याचे आश्वासन देते त्यावर काय म्हणणे आहे असे विचारले असता थोरात म्हणाले की अर्थनियोजन शिस्तीत नव्हते म्हणून योजना कोलमडली. पाडळसरे धरणाला महाविकास आघाडीच्या कार्यकाळात निधी मिळाला नाही असे विचारले असता त्यांनी आम्ही हा प्रश्न विधांसभेत मांडतो असे सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
माजी आमदार शिरीष दादा चौधरी प्रत्येक नागरिकाच्या आवाजाची महत्त्वाची भूमिका बजावणारा नेता आहे. अमळनेर तालुक्यातील नेत्यांमध्ये, शिरीष दाद...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
-
डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास अनेक स्थानिक प्रश्न लागणार मार्गी:- मगन भाऊसाहेब, अमळनेर:- मागील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे निम-कळमसरे परि...
-
अमळनेर : समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने पारोळ्याच्या एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अमळनेर पारोळा रस्त्यावर जिनिंग जवळ ९ रो...
-
अमळनेर- विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील सुमारे 42 गावात भरगच्च विकास कामांमुळे मंत्री अनिल पाटील यांनाच साथ मिळणार असा दावा ...
-
घरमालक कुटुंबाच्या चारही जणाविरुद्ध गुन्हा दाखल अमळनेर : घर खाली करण्यावरून वाद होऊन घरमालकाच्या कुटुंबाने भाडेकरूंच्या कुटुंबाल...
-
अमळनेर : ट्रॅक्टरची माहिती तलाठी व पोलिसांना देतो म्हणून कळमसऱ्याच्या तिघांनी तांदळी येथील एकाला चाकूने व इतर दोघांना चापटा बुक्क्य...
-
अमळनेर : तालुक्यातील चोपडाई कोंढावळ येथील एसएसटी पथकाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कार मधून सुमारे ४५ हजाराचा गुटखा आणि तंबाखू जप्त...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा