Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४
मंत्री अनिल पाटील व खासदार स्मिता वाघांची बाजारपेठेत पदयात्रा
व्यापाऱ्यांकडून मिळवल्या दिवाळी व विजयाच्या शुभेच्छा व आशीर्वाद
अमळनेर प्रतिनिधी : विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल भाईंदास पाटील व खासदार स्मिता वाघ या दोघांनी महायुतीची दिवाळी भेट पदयात्रा काढत व्यापारी बांधवांची भेट घेत दिवाळीच्या व विजयाच्या शुभेच्छा मिळवल्यात. लक्ष्मी पूजनाच्या दिवशीं सकाळीच पाच पावली देवी मंदिरात सर्व भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना महायुती चे कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक सर्व एकत्रित आल्यानंतर तेथून वाजत गाजत अनिल पाटील व स्मिता वाघ यांचा जयघोष करीत पदयात्रेस सुरूवात झाली.मंत्र्यांच्या पदयात्रेच्या वेळी व्यापाऱ्यांनी बाजारपेठत झालेले नवीन रस्ते , व्यापारी व ग्राहकांची झालेली सोय, शहरात सर्वत्र झालेले रस्ते व विकास कामे या बाबींची चर्चा केली.यावेळी शिवाजी मार्केट, बाजारपेठ परिसर, भागवत रोड, मारवाडी गल्ली, स्टेशन रॉड, सुभाष चौक परिसर, कुंटे रोड, दाणा बाजार, सराफ बाजार आदी परिसरातुन ही पदयात्रा काढण्यात आली.
गुन्हेगार आत गेल्याने व्यापारी सुरक्षित
शहरात अनेकदा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून व्यापारी बांधवाना धमकावून खंडणी मांगणे किंवा धाकाने उधार माल घेऊन जाऊन पुन्हा तोंड न दाखवणे असे प्रकार घडत होते, परंतु अनिल पाटील हे आमदार झाल्यापासून अनेक गुंड प्रवृत्तीची धरपकड होऊन ते कोंडले गेल्याने आज खऱ्या अर्थाने व्यापारी सुरक्षित झाले निर्भिड पणे व्यवसाय होत आहे. अशी प्रतिक्रिया विजय कुमार जैन यांनी व्यक्त केली.
दिवाळीचे फटाके तर आम्हीच वाजविणार
दिवाळी निमित्त ही फेरी काढून आपल्या व्यापारी बांधवाना शुभेच्छा आम्ही दिल्या आहेत.प्रत्येक ठिकाणी आम्हाला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद मिळाले असून व्यापारी बांधवांचा हा प्रतिसाद पाहता दिवाळीचे खरे फटाके तर आमची महायुतीच उडविणार हे स्पष्ट आहे असा विश्वास उमेदवार अनिल पाटील यांनी व्यक्त केला.
व्यापारी बांधव महायुतीच्याच पाठीशी
लोकसभा निवडणुकीत सर्व लहान मोठे व्यावसायिक व व्यापारी बांधव भाजप व महायुतीच्याच पाठीशी होते, शहरातील प्रत्येक व्यापारी बांधवानी मला मतदान केले आहे. आजही आम्ही दिवाळी भेटीच्या निमित्ताने प्रत्येकाचा उत्तम प्रतिसाद अनुभवला असून यामुळे व्यापारी बांधव या निवडणुकीत देखील भाजप महायुतीच्याच पाठीशी असल्याचे स्पष्ट आहे. महायुती आणि विकास कामे या बळावर अनिल पाटलांना जोरदार समर्थन मिळेल यात शंका नाही असा विश्वास खासदार स्मिता उदय वाघ यांनी व्यक्त केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर तालुक्यात बेकायदा सावकारांचा बोलबाला, झालारे झाला अखेर गुन्हा दाखल झाला..! बेकायदा सावकारांचे धाबे दणाणले, तालुक्यातील बडे मासे पोलि...
-
मालेगाव प्रतिनिधी:-कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कर भुसे याच्या वाहनावर काही टवाळखोरांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे...
-
शेतकरी वृद्ध असल्याने सुदैवाने बचावला अमळनेर : पाणी पिण्यासाठी पांझरा नदीत बैलांनी बैलगाडीसह धाव घेतली आणि वालखेडा येथील कोल्हापूर ब...
-
नेमकं असं असतं का शेतकरी मित्रानो जास्त फुटवा म्हणजे जास्त उत्पन्न ही समीकरणे आज कित्येक शेतकऱ्यांच्या डोक्यात असतात पण आपण कधी खोलात जाऊन व...
-
दै. तरूण गर्जना रिपोट भाऊबीजेच्या दिवशी तापी नदीत उडी मारून केली होती आत्महत्या अमळनेर : चारित्र्याचा संशय घेतल्याने पती नणंदेच्या जाचाला ...
-
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे लोक वर्गणी रद्दबातल व पाणीपट्टी वर व्याज आकारणी करू नये याबद्दल अमळनेर नगर परिषदे कडे जोरदार मागणी *...
-
साक्री तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सुविधा पूर्णपणे डासळली गेल्याने प्रशासनास पत्रव्यवहार करून हि आरोग्य विभागाने झोपेचं सोंग करून संबंधितावर...
-
शिंदखेडा प्रतिनिधी:- धुळ्ळ्याकडून शिरपूर कडे जाणाऱ्या विना वाहक शिवशाही ने रात्री ८ वाजेच्या सुमारास एसटी बस क्र. एमएच ०६ बीडब्ल्यु०४०७ ला ग...
-
अमळनेर प्रतिनिधी:तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींनी नियमित सेवेत घेण्याची मागणी करत प्रशासनासह लोकप्रति...
-
नवी दिल्ली : दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होत असलेल्या ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा