Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४
ट्रॅक्टर पकडून देतो म्हणून तिघांचा एकावर चाकू हल्ला
अमळनेर : ट्रॅक्टरची माहिती तलाठी व पोलिसांना देतो म्हणून कळमसऱ्याच्या तिघांनी तांदळी येथील एकाला चाकूने व इतर दोघांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना २२ रोजी रात्री साडे दहा वाजता पडावद फाट्यावर सार्वजनिक जागी घडली.
निलेश प्रतापसिंग परदेशी वय ४० रा तांदळी हा २२ ऑक्टोबर रोजी बेटावद येथे खाजगी कामाला गेला होता.मोटरसायकलने परत येत असताना पडावद फाट्याजवळ चेतन विजयसिंग राजपूत , नईम पठाण ,साहिल पठाण तिघे रा कळमसरे यांनी तिघांनी त्याला अडवून तू आमचे ट्रॅक्टरबाबत तलाठी व पोलिसांना माहिती देतो. तुला आता संपवूनच टाकतो म्हणून शिवीगाळ करू लागले. त्यावेळी निलेश ने शहापूर आणि जैतपिर येथील त्याचा पुतण्या आणि मित्रांना बोलावले. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला तरी तिघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते वादावादी वाढून चेतन राजपूत याने मांडीला चाकू मारला. निलेशच्या मांडीतून रक्त येऊ लागले. त्याचवेळी त्यांनी निलेशच्या पुतण्या कुणाल उदयसिंग परदेशी आणि मित्र भूषण विक्रमसिंग परदेशी यांनाही चापट बुक्क्यांनी मारहाण केली. बाकीच्या लोकांनी सोडवासोडव करून निलेश ला उपचारासाठी ग्रामिण रुग्णालयात नेले. तेथून पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठवले.उपचार घेऊन परत आल्यावर मारवड पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सचिन निकम करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
माजी आमदार शिरीष दादा चौधरी प्रत्येक नागरिकाच्या आवाजाची महत्त्वाची भूमिका बजावणारा नेता आहे. अमळनेर तालुक्यातील नेत्यांमध्ये, शिरीष दाद...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
-
डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास अनेक स्थानिक प्रश्न लागणार मार्गी:- मगन भाऊसाहेब, अमळनेर:- मागील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे निम-कळमसरे परि...
-
अमळनेर : समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने पारोळ्याच्या एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अमळनेर पारोळा रस्त्यावर जिनिंग जवळ ९ रो...
-
अमळनेर- विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील सुमारे 42 गावात भरगच्च विकास कामांमुळे मंत्री अनिल पाटील यांनाच साथ मिळणार असा दावा ...
-
घरमालक कुटुंबाच्या चारही जणाविरुद्ध गुन्हा दाखल अमळनेर : घर खाली करण्यावरून वाद होऊन घरमालकाच्या कुटुंबाने भाडेकरूंच्या कुटुंबाल...
-
अमळनेर : ट्रॅक्टरची माहिती तलाठी व पोलिसांना देतो म्हणून कळमसऱ्याच्या तिघांनी तांदळी येथील एकाला चाकूने व इतर दोघांना चापटा बुक्क्य...
-
अमळनेर : तालुक्यातील चोपडाई कोंढावळ येथील एसएसटी पथकाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कार मधून सुमारे ४५ हजाराचा गुटखा आणि तंबाखू जप्त...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा