Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

साक्री तालुक्यात होणार तिरंगी लढत,शिवसेनेचा आ.मंजुळा गावितांना कॉग्रेसचा प्रवीण चौरें सह भाजपचे बंडखोर उमेदवार मोहन सूर्यवंशीचे तगडे आव्हान



साक्री सन २००१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि संघाच्या कट्टर समर्थक माजी आमदार सौ.मंजुळा गावित यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार करत विजयाचा झेंडा फडकवला मात्र या निवडणुकीत त्यांनी पारंपारिक भाजपचा मतदारसंघ हिरावून घेत शिवसेना धनुष्य बान चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांचा सामना काँग्रेस पक्षाचे मुरब्बी राजकारणी माजी खासदार बापू चौरे यांचे सुपुत्र प्रवीण चौरे यांच्याशी होत आहे.भा.ज.प.ची उमेदवारी आपल्यालाच मिळेल या अपेक्षे- नेत असलेले मोहन सूर्यवंशी यांचा भ्रमनिरास झाला असून आता ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत माघारी नंतर अठरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
विधानसभा निवडणुकीत माघारी नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून खरा सामना काँग्रेसचे उमेदवार प्रवीण बापू चौरे आणि महा युतीचे उमेदवार सौ मंजुळा ताई गावित यांच्यातच चुरशीची लढत होणार आहे भाजप- ाचे बंडखोर उमेदवार निवड नुकित कोणाचा घात करणार याचे चित्र निवडणुकीच्या निकाला नंतरच लागणार आहे. साक्री विधानसभा निवडणुकीत सलग तीन वेळा माजीआमदार आणि मंत्री कै.गोविंदराव चौधरी यांनी भाजपाचा गड अबाधित राखत मजबूत पकड या मतदारसंघावर असताना या निवडणुकीत भाजपाने मतदारसंघाचा दावा काढून घेत वाटाघाटीच्या चर्चेअंती हा मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला अर्थातच शिवसेनेला सोडून देण्यात आल्याने भाजपाचे कार्यकर्ते आणि मतदार नाराज केला
असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे राजकीय विरोधक तसेच पदाधिकारी निवडणूक काळात काय भूमिका घेतात यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे.
शिवसेना शिंदे गटाने पहिल्या च यादीत विद्यमान अपक्ष आमदार आणि निवडणूक पूर्वीच धनुष्यबाण हाती घेतलेल्या सौ.मंजुळाताई गावित यांना उमेदवारी दिल्याने भाजपाच्या गोटात नाराजीचा सूर चर्चेतून उमटत होता आणि आहे. महाविकास आघाडी कडून साक्री विधान सभा मतदार संघ काँग्रेस पक्षाकडे गेल्याने तरुण आणि नवखे उमेदवार श्री.प्रवीण बापू चौरे यांना उमेदवारी मिळाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गट यांनी प्रवीण चौरे यांच्या उमेदवारीचे समर्थन आणि स्वागत करत शक्ती प्रदर्शन करत आपला प्रबळ दावा निवडून येण्यापूर्वीच या मतदारसंघावर आपला प्रभाव निर्माण केला आहे पैकी सहा अपक्ष यांनी माघार घेतल्याने १८ उमेदवार निवडणूक रिंगणात उत्तरले आहेत यात अनेक नवखे आणि तरुण उमेदवार आहेत तालुक्यातील मतदारांना आपला परिचय या निवडणुकीच्या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न संभाव्य उमेदवार करीत असल्याचे माघारी नतर दिसून येत आहे. साक्री विधानसभा निवडणुकीत खरा संघर्ष काँग्रेसचा पंजा आणि शिंदे गटाचा धनुष्यबाण यांच्यातच होणार आहे. असे असले तरी भाजप चे बंडखोर अपक्ष उमेदवार मोहन सूर्यवंशी हे देखील स्पर्धेत असल्याने तालुका वासियांचा भुव्या उंचावल्या आहेत साक्री विधानसभा निवडणूक पूर्वी भाजपा- तीलच दोन गट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपसात झुंजले यात एका गटाला कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकरी सहकारी संघ निवडणुकीत मतदारांनी विश्वास दाखवत निवडून दिले या विधानसभा निवडणुकीत ही हा वाद पेटला जाणार अशी शंका मतदार संघात घेतली जात असून निवडून येणाऱ्या कोणत्या उमेदवाराला याचा फटका बसेल हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट
होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध