Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४
सर्व जाती धर्माचा जिप गट महायुतीच्या पाठीशी- ऍड व्ही आर पाटील यांचा विश्वास
अमळनेर : सर्व जाती धर्मातील, सर्व क्षेत्रातील आणि सर्व स्तरातील लोक जेथे मिळून मिसळून राहतात तो गट म्हणजे आमचा कळमसरे- जळोद जिल्हा परिषद गट क्रांतीकारकांचे योगदान आणि विविध देवस्थानांचे वैभव लाभलेला हा परिसर कायम भाजपच्याच सोबत राहिला असून यंदाही महायुतीच्याच पाठीशी असल्याने महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना संपुर्ण गटातून भरभरून असे मतदान होईल असा विश्वास भाजपाचे माजी जि प सदस्य ऍड व्ही आर पाटील यांनी व्यक्त केला आहे.
🔵 या धार्मिक आणि क्रांतिकारकांच्या भूमीला विकासाभिमुख करण्याचे काम मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.आणि विकास केला म्हणून जनतेने देखील त्यांना साथ नक्कीच दिली पाहिजे आणि देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विकास कामा संदर्भात अधिक बोलताना ते म्हणाले की पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पाला मिळालेली गती असेल तसेच या प्रकल्पाला मिळालेली 4800 कोटींची सुप्रमा असेल किंवा त्यानंतर केंद्रीय योजनेसाठी पाठपुरावा असेल यासाठी अनिल दादांचे परिश्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत.याव्यतिरिक्त गावोगावी नवीन पाणीपुरवठा योजना देऊन पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न नक्कीच झाला आहे.हिंगोणे येथे बोरी नदीचे पाणी अडविण्यासाठी मृदू व जलसंधारण अंतर्गत 134 कोटींचे दोन सिमेंट बंधारे म्हणजे शेतकरी बांधवासाठी कृषी संजीवनी चा मार्गच ठरला आहे.भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानांचा दर्जा उचविण्यासाठी कपिलेश्वर व्यतिरिक्त नंदगाव येथील श्रीराम मंदिरासाठी तब्बल 2 कोटी निधीतून मोठा कायापालट केला,याव्यतिरिक्त या गावासाठी ग्रा प इमारत व सभामंडप यासाठीही निधी दिला,अंतुर्लीत कार्तिक स्वामी मंदिरासाठी सभामंडप देऊन भाविकांची सोय केली.गोवर्धन येथील काळभैरव मंदिरात सरंक्षण भिंत देऊन मंदिर सुरक्षित केले. .
गावोगावी असा शाश्वत विकास या भूमीपुत्राने करून दाखविला असल्याने विकास आणि महायुती या दोन गोष्टीं या गटातून त्यांना मतदान करण्यासाठी पुरक असून प्रचार दौऱ्यात प्रत्येक गावातून त्यांना प्रतिसाद मिळाला आहे. गटातील प्रत्येक व्यक्ती व आमचा संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या सोबत आहे. मतदानाच्या दिवशी निश्चितच त्यांच्यावर मतांचा भरभरून असा पाऊस पडेल असा विश्वास व्ही आर पाटील यांनी व्यक्त केला
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर तालुक्यात बेकायदा सावकारांचा बोलबाला, झालारे झाला अखेर गुन्हा दाखल झाला..! बेकायदा सावकारांचे धाबे दणाणले, तालुक्यातील बडे मासे पोलि...
-
मालेगाव प्रतिनिधी:-कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कर भुसे याच्या वाहनावर काही टवाळखोरांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे...
-
नेमकं असं असतं का शेतकरी मित्रानो जास्त फुटवा म्हणजे जास्त उत्पन्न ही समीकरणे आज कित्येक शेतकऱ्यांच्या डोक्यात असतात पण आपण कधी खोलात जाऊन व...
-
साक्री तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सुविधा पूर्णपणे डासळली गेल्याने प्रशासनास पत्रव्यवहार करून हि आरोग्य विभागाने झोपेचं सोंग करून संबंधितावर...
-
अमळनेर प्रतिनिधी:तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींनी नियमित सेवेत घेण्याची मागणी करत प्रशासनासह लोकप्रति...
-
शिंदखेडा प्रतिनिधी:- धुळ्ळ्याकडून शिरपूर कडे जाणाऱ्या विना वाहक शिवशाही ने रात्री ८ वाजेच्या सुमारास एसटी बस क्र. एमएच ०६ बीडब्ल्यु०४०७ ला ग...
-
तरूण गर्जन रिपोट शिरसाळे येथील रवींद्र वर पोक्सो चा गुन्हा दाखल अमळनेर : पालनकर्ता बापानेच ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्...
-
नवी दिल्ली : दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होत असलेल्या ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी य...
-
शेतकरी वृद्ध असल्याने सुदैवाने बचावला अमळनेर : पाणी पिण्यासाठी पांझरा नदीत बैलांनी बैलगाडीसह धाव घेतली आणि वालखेडा येथील कोल्हापूर ब...
-
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे लोक वर्गणी रद्दबातल व पाणीपट्टी वर व्याज आकारणी करू नये याबद्दल अमळनेर नगर परिषदे कडे जोरदार मागणी *...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा