Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, १० नोव्हेंबर, २०२४
सर्वत्र होणारी विकास कामे विरोधकांना दिसत नाही का ?
जातिभेदावर नव्हे तर शास्वत विकासावर जनता खुश- भागवत पाटील
_ अंमळनेर :मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी अंमळनेर मतदारसंघात केलेला शासवत विकास जनतेला दिसत असून विरोधकांना तो दिसणार नाही,मतदार संघात यावेळी जातीभेद नसून विकासावर जनता खुश आहे, आणि विकासावरच प्रेम करणारे लोक असल्याने अनिलदादा मोठ्या फरकाने यंदा विजयी होतील असा दावा राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला._
महायुती च्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.यावेळी भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष विजय राजपूत, सेनेचे तालुकाप्रमुख प्रथमेश पवार,शहर प्रमुख संजय पाटील,राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुक्तार खाटीक उपस्थित होते.यावेळी विविध आरोपांचे खंडन करताना भागवत पाटील म्हणाले की माजी आमदार अनिल दादांना माजी म्हणत आहेत पण 23 नोव्हेंबर 2014 पर्यंत आमदार व मंत्री पदावर ते कायम आहेत.धरणाच्या 4800 कोटीच्या सुप्रमाला ते साधी म्हणतात पण ती साधी नाही,15 वर्षांतर सुप्रमा मिळाली असून शिरीष चौधरींनी देखील एक सुप्रमा आणली हा त्यांचा दावा खोटा आहे,उलट याच धरणाला माजी आमदार पांढरा हत्ती म्हणायचे,1998 पासून निम्न तापी प्रकल्प सुरू होऊन आज 26 वर्ष झाली,आपण सर्वांचा कार्यकाळ पहिला,मात्र पाच वर्षात साडेचारशे कोटी अनिल दादानी आणले असून आज धरणाचे झालेले काम दृश्य स्वरूपात दिसते ,विकासाच्या बाबतीत बोलायचे झाले तर प्रत्येक गावात ग्राप आणि तलाठी कार्यालय असेल इतर मूलभूत सुविधांची कामे असतील, रस्ते असतील,शेतकरी बाधवांसाठी 50 गावात शेत जोड रस्ते दिले आहेत.आणि ठोस काम सांगायचे झाल्यास शहरात उभी राहत असलेली प्रशासकीय इमारत,सर्व कार्यालय येथे येणार असल्याने सामान्य माणसाचे हेलपाटे थांबणार आहेत.प स इमारत बांधकामही सुरू झाले आहेत.बस स्टँड 10 कोटी मिळाल्याने नवीन होणार आहे.शहरात नवीन रस्ते,डीपी रोड, दगडी दरवाजा, मंगळ मंदिरासाठी 25 कोटी मंजूर केले आहेत.मदत पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून काय केले यावर आमचे उत्तर आहे की तालुक्यातील कोणत्याही शेतकरी बांधबांचे बँक स्टेटमेंट बघा कोणाच्या खात्यावर किती पैसे आलेत ते दिसेल,तब्बल साडे सहाशे कोटी आमच्या शेतकरी राजाला गारपीट,पीकविमा,अवकाळी पाऊस या माध्यमातून मिळाले आहेत.मतदारसंघात लहान मोठे बंधारे बांधून सिंचन क्षमता वाढवली गेली आहे,मुडी व मांडळ व फाफोरे येथे ब्रिटिश कालीन फळ बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.त्यामुळे विकसाच्या बाबतीत तरी विरोधकांनी बोलूच नये असे सांगत गुंडगिरी चे समर्थक कोण हे जनतेला माहीत असुन माजी आमदारांचा गुन्हेगारासोबत असलेले सेल्फी चे चित्र त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले.आणि निवडणुका कायदा व सुव्यवस्था राखून खेळीमेळीच्या वातावरणातच होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
भाजपातून ते निलंबितच
माजी आमदार शिरीष चौधरी यांना भाजपने पक्षातून
निष्कासित केले असल्याचे पत्र त्यांनी यावेळी सादर करत त्यांचा पक्षाशी काहीही संबंध राहिला नसल्याचा खुलासा भागवत पाटील यांनी केला.श्री चौधरी हे पत्र बनावट असल्याचे सांगत असल्याचे पत्रकारांनी म्हटले असता भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी या पत्राबाबत आम्ही पक्ष श्रेष्ठींकडे खुलासा केला असता त्यांनी पत्र अधिकृत असल्याचा दुजोरा दिला असून याठिकाणी जे जे पक्ष विरोधी कारवायांमध्ये सहभागी असतील त्यांच्यावर देखील कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
-
डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास अनेक स्थानिक प्रश्न लागणार मार्गी:- मगन भाऊसाहेब, अमळनेर:- मागील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे निम-कळमसरे परि...
-
अमळनेर : समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने पारोळ्याच्या एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अमळनेर पारोळा रस्त्यावर जिनिंग जवळ ९ रो...
-
अमळनेर- विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील सुमारे 42 गावात भरगच्च विकास कामांमुळे मंत्री अनिल पाटील यांनाच साथ मिळणार असा दावा ...
-
घरमालक कुटुंबाच्या चारही जणाविरुद्ध गुन्हा दाखल अमळनेर : घर खाली करण्यावरून वाद होऊन घरमालकाच्या कुटुंबाने भाडेकरूंच्या कुटुंबाल...
-
अमळनेर : तालुक्यातील चोपडाई कोंढावळ येथील एसएसटी पथकाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कार मधून सुमारे ४५ हजाराचा गुटखा आणि तंबाखू जप्त...
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
पारोळा येथील सभेत डॉ. शिंदे यांना विजयी करण्याचे केले आवाहन, अमळनेर:- काल ११ रोजी पारोळा येथे महाविकास आघाडीच्या सतीश पाटील व डॉ. अनिल शिंदे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा