Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, १० नोव्हेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
जो पक्षाला आणि आपल्या नेत्याला धोका देऊ शकतो तो सामान्य जनतेला धोका देऊ शकतो- प्रवीण पाठक यांचा आरोप
जो पक्षाला आणि आपल्या नेत्याला धोका देऊ शकतो तो सामान्य जनतेला धोका देऊ शकतो- प्रवीण पाठक यांचा आरोप
अमळनेर : निष्ठावंत आणि भूमिपुत्र म्हणून अमळनेरच्या जनतेने निवडून दिलेल्या आमदार पाटील यांनी पक्षाशी गद्दारी करीत महायुतीत सहभागी हाऊन पक्षासह जनतेला धोका दिला. जो पक्ष आणि नेत्याला राजकीय स्वार्थासाठी धोका देऊ शकतो तो सर्वसामान्य जनतेला केव्हा धोका देईल याचा नेम नाही. त्यामुळे गद्दारीला जागा दाखण्याची आणि शरद पवार साहेबांचा शब्द खरा ठरवण्याची आता वेळ आली आहे असा घणाघात प्रविण पाठक यांनी केला.
गेल्या पंच वार्षिक निवडणुकीत भूमिपुत्र म्हणून अमळनेरच्या जनतेने अनिल पाटील यांना डोक्यावर घेतले आणि नंद पुत्राला घरी बसवले. त्याच अनिल पाटलाने निवडून आल्यावर अनैतिकचा खेळ सुरू केला आहे. राज्यात सत्ता स्थापनेच्या समीकरणात अजित पवार यांनी भाजपशी घरोबा करून देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी आजही महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही. वयाच्या ८० वर्षावरील शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत भर पावसात सभा घेऊन आमदार निवडून आले. अमळनेर मतदार संघात दोन वेळा आपटी खाणारे अनिल पाटील ही निवडून आले. त्यांनी अजित पवारांना साथ देऊन नॉट रिचेबल राहिले. अमळनेरचा आमदार हरवला अशी परिस्थिती झाली होते. हे बंड शरद पवार साहेबांनी मोडून काढले. पुन्हा अजित पवार यांनी भाजपशी अभद्र युती केल्याने अनिल पाटील पुन्हा त्यांच्या सोबत गेले आणि मंत्रिपद पदरात पाडून घेत 'स्वतःचे पुनर्वसन' करून जनतेच्या भावनांना विस्थापित केले. मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची कामे आणि टक्केवारीचे दुकानही थाटले. पण जो आपल्या पक्षाला आणि नेत्याला धोका देऊ शकतो तो तुम्हा आम्हाला धोका देणार नाही हे कशावरून असा प्रश्न उपस्थित होत आहे.निवडणूक आली की जात दिसते, नातेवाईक दिसतात पण ५ वर्ष मतदारांना गर्विष्ठ, अहंकारी भाषा वापरुन अपमानित करणाऱ्या आणि भूमिशी गद्दारी करणाऱ्या मंत्री ला जनताच जागा दाखविणार...
अभी नहीं तो कभी नहीं
सत्ता धारी शासनबाबत राज्यात नाराजी आहे. त्यामुळे टक्केखोर आणि गुंडगिरी वाल्यांना निवडून आपले अनमोल मत फुकट वाया घालू नका. अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी हेच मतदार संघाच्या विकासाला दिशा देऊ शकतात. स्वच्छ आणि पारदर्शी व्यक्तिमत्व, निष्कलंक छबी असल्याने त्यांनाच प्रचंड मतांनी विजयी करून द्या, असे आवाहन प्रविण पाठक यांनी केले आहे.
गद्दारी' का डाग अच्छा नहीं हैं !
आमदार अनिल पाटील यांच्यावर गद्दारीचा डाग आहे. त्यांनी कोणतेही डिटर्जंट पावडर आणले तरी ते धुतले जाणार नाही. कारण हा डाग कपड्यांवर नसून मतदारांच्या भावनांना ठेच पोहचवणार आहे. म्हणून 'गद्दारी' का डाग अच्छा नहीं हैं ! असे जनता बोलू लागली आहे. असाही आरोप पाठक यांनी केला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
-
माजी आमदार शिरीष दादा चौधरी प्रत्येक नागरिकाच्या आवाजाची महत्त्वाची भूमिका बजावणारा नेता आहे. अमळनेर तालुक्यातील नेत्यांमध्ये, शिरीष दाद...
-
डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास अनेक स्थानिक प्रश्न लागणार मार्गी:- मगन भाऊसाहेब, अमळनेर:- मागील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे निम-कळमसरे परि...
-
अमळनेर : समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने पारोळ्याच्या एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अमळनेर पारोळा रस्त्यावर जिनिंग जवळ ९ रो...
-
अमळनेर- विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील सुमारे 42 गावात भरगच्च विकास कामांमुळे मंत्री अनिल पाटील यांनाच साथ मिळणार असा दावा ...
-
अमळनेर : ट्रॅक्टरची माहिती तलाठी व पोलिसांना देतो म्हणून कळमसऱ्याच्या तिघांनी तांदळी येथील एकाला चाकूने व इतर दोघांना चापटा बुक्क्य...
-
घरमालक कुटुंबाच्या चारही जणाविरुद्ध गुन्हा दाखल अमळनेर : घर खाली करण्यावरून वाद होऊन घरमालकाच्या कुटुंबाने भाडेकरूंच्या कुटुंबाल...
-
अमळनेर : तालुक्यातील चोपडाई कोंढावळ येथील एसएसटी पथकाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कार मधून सुमारे ४५ हजाराचा गुटखा आणि तंबाखू जप्त...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा