Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४
अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांच्या बूथ मेळाव्यास चांगला प्रतिसाद
अमळनेर : विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिरीष दादा चौधरी यांच्या शहर कार्यकर्ता मेळाव्यास हजारो कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी रवींद्र चौधरी यांनी आपले मत व्यक्त केले की चांगली बॅटिंग करण्यासाठी आपल्याला योगायोगाने बॅट हे चिन्ह मिळाले आहे. आपल्याला ही लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही शिरीष दादाच्या पाठीमागे उभी असून शिरीष दादाने अमळनेर साठी विकासच करण्याचे ध्येय ठरवले आहे. आमदारकीच्या काळात शिरीष चौधरी यांनी अमळनेर साठी अंबाऋषी टेकडी जवळचा रेल्वे ब्रिज, नगर परिषदेची भव्य अशी इमारत, भूतो ना भविष्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, अमळनेरचे जीवन संजीवनी समजले जाणारे कलाली डोह चे पुनर्जीवन करून अंमळनेरच्या नागरिकांचे जीवन सुजलाम सुफलाम करण्याचा मानस शिरीष चौधरी यांचा आहे.
गुलाबराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपल्याला सर्वांना शिरीष दादा चौधरी यांना आमदार म्हणून बघायचे आहे योगायोग बघा आपल्याला बॅट हे चिन्ह मिळाले आहे.
त्याच बॅटने षटकार लावून विरोधकांना घरी पाठवू. माझ्या तालुक्यातील मंत्राला प्रचारासाठी एका खेड्यातून नवे नवे प्रत्येक खेळातून हाकलून लावण्याचे सत्र सध्या सुरू आहे. विकासाच्या नावाचे भुलथापा मारणाऱ्यांना जनता हाकलून लावते याची प्रचिती तुम्हाला आलेच असेल. अमळनेर नगरपरिषदेची ९०० रुपये असलेले पाणीपट्टी १८०० रुपये केली अमळनेरच्या नागरिकांना हे सांगण्याची गरज नाही. ते तुम्हाला तुमची योग्य जागा नक्कीच दाखवतील. यावेळी शहरातील अर्बन बँक चेअरमन मोहन सातपुते, महाजन समाज अध्यक्ष मनोहर महाजन , मुस्लिम समाज अध्यक्ष हाजी साहेब, माजी नगरसेवक सलिम टोपी, दादा पवार, श्रीराम चौधरी, सुरेश चौधरी, चंद्रकांत साळी, बबली पाठक, गुलाब पाटील,गोरख तात्या, नाना धनगर, रमेश देव, चंद्रकांत कंखरे, आरिफ भाया, गुलाम नबी, फिरोज पठाण, नविद शेख, पांडुरंग महाजन, भाऊसाहेब महाजन, धनु महाजन, पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशिव, दिपक चौघुले, अबु महाजन, गणेश महाजन, भरत पवार, किरण बागुल, ॲड सुरेश सोनवणे, कैलास पाटील, कैलास भील, नरेश कांबळे, महेश जाधव, अमोल भावसार, राम लखन, जयंत पाटील, अवि जाधव, प्रविण सातपुते, शुभम यादव, पराग चौधरी, मनोज शिंगाने, पंकज भोई, किशोर पाटील, संतोष पाटील, बिंदू सोनवणे, सुनिल भामरे, सुनिल भोई, विजय भोई व शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर तालुक्यात बेकायदा सावकारांचा बोलबाला, झालारे झाला अखेर गुन्हा दाखल झाला..! बेकायदा सावकारांचे धाबे दणाणले, तालुक्यातील बडे मासे पोलि...
-
मालेगाव प्रतिनिधी:-कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कर भुसे याच्या वाहनावर काही टवाळखोरांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे...
-
नेमकं असं असतं का शेतकरी मित्रानो जास्त फुटवा म्हणजे जास्त उत्पन्न ही समीकरणे आज कित्येक शेतकऱ्यांच्या डोक्यात असतात पण आपण कधी खोलात जाऊन व...
-
साक्री तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सुविधा पूर्णपणे डासळली गेल्याने प्रशासनास पत्रव्यवहार करून हि आरोग्य विभागाने झोपेचं सोंग करून संबंधितावर...
-
शिंदखेडा प्रतिनिधी:- धुळ्ळ्याकडून शिरपूर कडे जाणाऱ्या विना वाहक शिवशाही ने रात्री ८ वाजेच्या सुमारास एसटी बस क्र. एमएच ०६ बीडब्ल्यु०४०७ ला ग...
-
अमळनेर प्रतिनिधी:तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींनी नियमित सेवेत घेण्याची मागणी करत प्रशासनासह लोकप्रति...
-
शेतकरी वृद्ध असल्याने सुदैवाने बचावला अमळनेर : पाणी पिण्यासाठी पांझरा नदीत बैलांनी बैलगाडीसह धाव घेतली आणि वालखेडा येथील कोल्हापूर ब...
-
नवी दिल्ली : दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होत असलेल्या ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी य...
-
तरूण गर्जन रिपोट शिरसाळे येथील रवींद्र वर पोक्सो चा गुन्हा दाखल अमळनेर : पालनकर्ता बापानेच ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्...
-
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे लोक वर्गणी रद्दबातल व पाणीपट्टी वर व्याज आकारणी करू नये याबद्दल अमळनेर नगर परिषदे कडे जोरदार मागणी *...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा