Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

पारोळा तालुक्यातील ४२ गावांवर डॉ अनिल शिंदेंची नजर


 




महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना घेऊन विकासाचा  अनुशेष भरण्याचे आश्वासन

    अमळनेर :  विधानसभा मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील ४२ गावांकडे आजी माजी लोकप्रतिनीधींनी दुर्लक्ष केल्याचे विकास मोठ्या प्रमाणावर खुंटला आहे. मात्र निवडून आल्यास विकासाचा अनुशेष भरून काढणार असल्याचे आश्वासन डॉ. अनिल शिंदे यांनी प्रचारादरम्यान ग्रामस्थांना दिले.
           गेल्या दहा वर्षांत लोकप्रतिनिधींना फक्त मते मागण्यापुरता आमची आठवण येते, अशी भावना ह्या ४२ खेड्यातील ग्रामस्थ बोलून दाखवली. या खेड्यांतील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून डागडुजीची ही तसदी न घेतल्याने ग्रामस्थांचा मोठा रोष व्यक्त होत आहे. मोजक्या गावात निधी देऊन इतर गावातील ग्रामस्थांची केवळ आश्र्वासानांवर बोळवण केली जात असल्याचे ग्रामस्थांनी डॉ. शिंदे यांना प्रचारादरम्यान बोलून दाखवले. यावेळी मतदारसंघात पुन्हा परिवर्तन घडवून मला सेवेची संधी दिल्यास या ४२ खेड्यातील मूलभूत समस्या सोडवून मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकासाचा अनुशेष भरून काढेल असे आश्वासन डॉ. अनिल शिंदे यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचारादरम्यान पारोळा तालुक्यातील ह्या ४२ गावात डॉ. शिंदे यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
      डॉ शिंदे यांनी माजी आमदार साहेबराव पाटलांचीही भेट घेतली असून  आघाडीचे प्रा सुभाष पाटील ,तिलोत्तमा पाटील , प्रा श्याम पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी शिंदेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध