Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४
चोरट्यांनी तीन घरे फोडली.तीन लाखाचे सोन्याचांदीचे दागिने व रोख लांबवली*
अमळनेर : तालुक्यातील दहिवद येथे अज्ञात चोरट्यानी तीन घरे फोडून सुमारे तीन लाख रुपयांचे सोने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना ४ रोजी रात्री ते ५ रोजी सकाळ दरम्यान घडली.
वअमोल रमेश महाजन यांनी फिर्याद दिली की ५ रोजी सकाळी ५ वाजता नळाला पाणी आले म्हणून वडील उठले असता त्यांना किचन मधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तेव्हा अमोलच्या आईने धान्याच्या कोठीत ठेवलेले ९ हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम सोने व ९८ हजार रुपये रक्कम तपासले असता ते मिळून आले नाही. आजूबाजूच्या लोकांना हे संगीतले असता त्यांनी माहिती दिली की गावातीलच भगवान भिवंसन माळी आणि नीता संजय वाघ हे बाहेरगावी गेलेले असताना त्यांचीही घरे फोडण्यात आली. भगवान माळी यांच्या घरातील ५० हजार रुपये रोख आणि २४ हजार रुपयांच्या ८ ग्राम सोन्याच्या बाळ्या तर नीता वाघ यांच्या घरातील ५० हजार रुपये रोख , २० हजार रुपये किमतीचे १०० ग्राम चांदीचे दागिने , १५ हजार रुपये किमतीचे ५ ग्राम मनी मंगळसूत्र, ३ हजार रुपये किमतीची १ ग्राम सोन्याची बाळी , १५ हजार रुपये किमतीच्या ५ ग्राम सोन्याच्या रिंग , १२ हजार रुपये किमतीच्या चार ग्राम सोन्याच्या कड्या , ९ हजार रुपये किमतीचे ३ ग्राम सोन्याचे डोरलं असा एकूण तिन्ही घरातील ३ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक विकास देवरे ,एपीआय जगदीश गावित , पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री ऐन विधानसभा निवडणूकीत तोंडावर साक्रीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विधासभा निवडणूकीत उमदेवारी देतांना निष्ठावंताना डावलून आय...
-
अमळनेर प्रतिनिधी : भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुचाकीला मागाहून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ३० रोजी सकाळी ८ वाजेच्या सु...
-
अमळनेर प्रतिनिधी :- कट मारल्याच्या वादातून एकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना ३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास जळोद अमळगाव शिवारात घडली.विका...
-
साक्री तालुक्याचा काटवाण भागातील म्हसदी परिसरात सामाजिक कार्यातून उल्लेखनीय कामगिरी करणारे काळगाव गावचे भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ते उत्कृष्...
-
साक्री तालुक्यात् शेणपूर फाट्याजवळ चारचाकी वाहून व मोटरसायकल मध्ये अपघात होवून मोटार सायकल चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे,श्...
-
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील मुंडी मांडळ जि. प.गटात जनतेच्या मतदानरुपी प्रेमाची परतफेड मंत्री अनिल पाटील यांनी विकास कामांच्या रूपान...
-
साक्री प्रतिनिधी- पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे हे पिंपळनेर पोलीस ठाण्यात हजर असतांना त्यांना गुप्त बातमीदारा मा...
-
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना घेऊन विकासाचा अनुशेष भरण्याचे आश्वासन अमळनेर : विधानसभा मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील ४२ गावांक...
-
साक्री तालुक्यातील माजी खासदार कै. डॉ. साहेबराव बागुल (भाजप) यांचे लहान बंधु तसेच डॉ.तुळशिराम गावीत शिवसेना जिल्हाप्रमुख आणि आमदार सौ.मंजुळा...
-
अमळनेर प्रतिनीधी:- माध्यमिक विद्यालय लोन ग्रुप चे वर्ष 2005/2006 माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा तब्बल 1...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा