Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४
मंत्री अनिल पाटील यांच्या विकासकामांच्या परतफेडीने मुडी मांडळ गटात जनता समाधानी
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील मुंडी मांडळ जि. प.गटात जनतेच्या मतदानरुपी प्रेमाची परतफेड मंत्री अनिल पाटील यांनी विकास कामांच्या रूपाने केल्याने जनता समाधानी झाली असल्याचे मत भाजपा चे जिल्हा सरचिटणीस तथा अमळनेर प.स.चे उपसभापती भिकेश पावभा पाटील यांनी व्यक्त केले.
गावोगावी जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना असेल सामाजिक सभागृह असेल,, गावा-गावाना जोडणारे दर्जेदार रस्ते, स्वागतसाठी आकर्षक व सुंदर असे प्रवेशद्वार, शुद्ध पाण्यासाठी आर.ओ. फिल्टर प्लांट, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय इमारती असतील,,गाव अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरणं असेल, संरक्षण भिंत, पादचारी पूल असेल,, स्मशानभूमी व सांत्वनशेड असेल, बालगोपालासाठी अंगणवाडी व शाळा इमारती, शाळा संरक्षण भिंत, शाळा डिजिटल साहित्य, तरुणाईसाठी अभ्यासिका, व्यायाम शाळा व व्यायाम साहित्य असेल,,दलित व भिल्ल वस्तीत विविध विकासकामे, स्मारक व चौक सुशोभीकरण असतील,,शेत-शिवार रस्ते असतील,, तीर्थक्षेत्र व रोजगार हमी अंतर्गत विकामकामे, आरोग्य उपकेंद्रासाठी विविध आरोग्य साहित्य पुरवठा, अल्पसंख्याक समाजासाठी विविध विकासकामे, नवीन विद्युत डीपी, पोल, तारा असतील असे एक गाव नाही जेथे भूमीपुत्र अनिलदादा चे विकास काम नाही. त्यामुळे विकास कामांना आरसा कशाला हवा? पांझरा नदीचे पाणी वाहून जाऊ नये यासाठी शहापुर, बाम्हणे येथे बंधारे टाकून पाणी अडवले गेल्याने या परिसरातील गावामधील शेतकरी राजास सुखी व समृद्ध होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही हा आमचा विश्वास आहे.मुडी येथील फड बंधारा देखील याच भूमीपुत्राने पुनर्जीवित करून त्यासोबतच मांडळ येथील ब्रिटिश कालीन कालवा देखील पुनर्जीवित करून पांझरेचे पाणी लवखी व भाला नाल्यात टाकण्याच्या योजनेचा शुभारंभ केल्याने व लवखी नाल्यावर विविध बांध-बंधाऱ्यामुळे २० ते २२ गावांना फायदा होणार आहे.
विकासात्मक दृष्टी असलेले अनिल पाटील हे आमचे महायुतीचे उमेदवार असल्याने आणि आमच्या परिसरात भाजप विचारांचे अधिक प्राबल्य असल्याने अनिल दादांसाठी अतिशय पूरक असे वातावरण असून जनता निश्चितच भरभरून मतदान त्यांच्या पारड्यात टाकून राज्यातील भाजप पक्षश्रेष्ठींचे हात बळकट करेल असा विश्वास ही भिकेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री ऐन विधानसभा निवडणूकीत तोंडावर साक्रीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विधासभा निवडणूकीत उमदेवारी देतांना निष्ठावंताना डावलून आय...
-
अमळनेर प्रतिनिधी : भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुचाकीला मागाहून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ३० रोजी सकाळी ८ वाजेच्या सु...
-
अमळनेर प्रतिनिधी :- कट मारल्याच्या वादातून एकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना ३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास जळोद अमळगाव शिवारात घडली.विका...
-
साक्री तालुक्याचा काटवाण भागातील म्हसदी परिसरात सामाजिक कार्यातून उल्लेखनीय कामगिरी करणारे काळगाव गावचे भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ते उत्कृष्...
-
साक्री तालुक्यात् शेणपूर फाट्याजवळ चारचाकी वाहून व मोटरसायकल मध्ये अपघात होवून मोटार सायकल चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे,श्...
-
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील मुंडी मांडळ जि. प.गटात जनतेच्या मतदानरुपी प्रेमाची परतफेड मंत्री अनिल पाटील यांनी विकास कामांच्या रूपान...
-
साक्री प्रतिनिधी- पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे हे पिंपळनेर पोलीस ठाण्यात हजर असतांना त्यांना गुप्त बातमीदारा मा...
-
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना घेऊन विकासाचा अनुशेष भरण्याचे आश्वासन अमळनेर : विधानसभा मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील ४२ गावांक...
-
भूम, शिवसेना-महायुतीच्या वतीने दि २९ रोजी उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांनी २४३ भूम-परंडा-वाशी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल...
-
अमळनेर प्रतिनिधी : गेल्या पाच वर्षात पातोंडा दहिवद जिल्हा परिषदेच्या गटात शाश्वत असा विकास मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केल्याने या गटात ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा