Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४
सारबेट्याच्या दोघांना गांजा बाळगल्याबद्दल अटक
हेडावे जवळ रचला होता सापळा ,एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा
अमळनेर : शहरात गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या सारबेटे येथील दोघांना पोलिसांनी हेडावे येथे सापळा रचून पकडण्यात आले. आरोपींकडून सुमारे साडेतीन किलो गांजा जप्त करण्यात आला असून आरोपीना अटक करण्यात आली आहे
पोलीस निरीक्षक विकास देवरे याना गोपनीय माहिती मिळाली की तालुक्यातील सारबेटे येथून एम एच १९ ,डी यु ९५४३ या मोटरसायकलवर दोन जण अमळनेर शहरात गांजा विकण्यासाठी आणत आहेत. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे , हेडकॉन्स्टेबल सुनील महाजन , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , जितेंद्र निकुंभे ,अमोल पाटील , विनोद संदानशीव ,संतोष नागरे , सागर साळुंखे याना घेऊन हेडावे गावाजवळ सापळा रचला. सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास दोन जण मोटरसायकल क्रमांक एम एच १९ , डीयु ९५४३ वर येताना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यांच्या दोघांच्या मध्ये पांढऱ्या रंगाची प्लास्टिक गोणी आढळून आली. त्यात गांजा सापडला. पोलिसांनी त्यांची नावे विचारली असता अकील इब्राहिम मेवाती वय ३७ व मोहसीनखान शरीफखान मेवाती वय ३२ दोन्ही रा सारबेटे असे सांगितले. पोलिसांनी शासकीय अधिकार्यांच्या समक्ष गांजाचे मोजमाप केले असता ६८ हजार रुपये किमतीचा ३ किलो ४३२ग्राम गांजा , ६० हजार रुपये किमतीची गुन्हयात वापरलेली मोटरसायकल व १० हजार रुपये किमतीचे मोबाईल असा एकूण १ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिलिंद सोनार यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायदा कलम ८ ,२० ,२२ व भारतीय न्यायासंहिता २०२३ च्या कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत. आरोपीना अटक करण्यात आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
माजी आमदार शिरीष दादा चौधरी प्रत्येक नागरिकाच्या आवाजाची महत्त्वाची भूमिका बजावणारा नेता आहे. अमळनेर तालुक्यातील नेत्यांमध्ये, शिरीष दाद...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
-
डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास अनेक स्थानिक प्रश्न लागणार मार्गी:- मगन भाऊसाहेब, अमळनेर:- मागील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे निम-कळमसरे परि...
-
अमळनेर : समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने पारोळ्याच्या एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अमळनेर पारोळा रस्त्यावर जिनिंग जवळ ९ रो...
-
अमळनेर- विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील सुमारे 42 गावात भरगच्च विकास कामांमुळे मंत्री अनिल पाटील यांनाच साथ मिळणार असा दावा ...
-
घरमालक कुटुंबाच्या चारही जणाविरुद्ध गुन्हा दाखल अमळनेर : घर खाली करण्यावरून वाद होऊन घरमालकाच्या कुटुंबाने भाडेकरूंच्या कुटुंबाल...
-
अमळनेर : तालुक्यातील चोपडाई कोंढावळ येथील एसएसटी पथकाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कार मधून सुमारे ४५ हजाराचा गुटखा आणि तंबाखू जप्त...
-
अमळनेर : ट्रॅक्टरची माहिती तलाठी व पोलिसांना देतो म्हणून कळमसऱ्याच्या तिघांनी तांदळी येथील एकाला चाकूने व इतर दोघांना चापटा बुक्क्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा