Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
शेणपूर फाट्या जवळ कार व मोटरसायकल मध्ये भीषण अपघात; अपघातात मोटरसायकल चालकाचा दुर्देवी मृत्यू..
शेणपूर फाट्या जवळ कार व मोटरसायकल मध्ये भीषण अपघात; अपघातात मोटरसायकल चालकाचा दुर्देवी मृत्यू..
साक्री तालुक्यात् शेणपूर फाट्याजवळ चारचाकी वाहून व मोटरसायकल मध्ये अपघात होवून मोटार सायकल चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे,श्री चंदू बाबूराव सोनवणे (वय ४३) व्यवसाय मजुरी रा.शेणपुर ता.साक्री यांनी साक्री पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार,साक्री तालुक्यातील शेणपूर गावा पासून अवघ्या काही अंतरावरच असलेल्या साक्री ते पिंपळनेर रस्त्यावरील शेणपूर फाट्या जवळ दि.०१/११/२०२४ रोजी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास मोटरसायकल चालक श्री.साहेबराव दामू पवार (वय ५०) रा.शेणपुर ता.साक्री हे शेतात लाकडे घेण्यासाठी हिरो होंडा सिडी डिलक्स मो.सा.क्र.MH 18 AV 6753 ने मोटर सायकल ने जात असतांना समोरून येणाऱ्या आय 20 कार क्र.MH 18 AJ 2542 ने ओव्हर टेक करतांना रॉन्ग साईटला येत् मोटर सायकलला जोरदार धडक दिल्याने मोटर सायकल चालक साहेबराव पवार यांचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकरी व शेणपूर गावाचे पोलीस पाटील हेमराज काळे हे घटनास्थळी पोहचले त्यानंतर श्री चंदू बाबुराव सोनवणे यांनी साक्री पोलीस स्टेशन ला कार चालक श्री.रितेश छबिलाल सोनवणे रा.देवपूर धुळे यांच्या विरूध्द फिर्याद दाखल केली आहे.चंदू सोनवणे यांच्या फिर्यादीवरून साक्री पोलीस स्टेशनला मोटर वाहन कायदा प्रमाणे CCTNS NO-0371/2024 BNS 2023 चे कलम 106(1),281,125(A),125(B),324 गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी साक्री पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अनिल बागुल,पोलीस उप निरीक्षक राजेंद्र साळुंके याच्यासह कर्मचारी पोहचले.पुढील तपास पोलिस उप निरीक्षक राजेंद्र साळुंके करीत आहेत.ऐन दिवाळीत पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेनंतर शेणपुर गावात शोककळा पसरली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर तालुक्यात बेकायदा सावकारांचा बोलबाला, झालारे झाला अखेर गुन्हा दाखल झाला..! बेकायदा सावकारांचे धाबे दणाणले, तालुक्यातील बडे मासे पोलि...
-
मालेगाव प्रतिनिधी:-कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कर भुसे याच्या वाहनावर काही टवाळखोरांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे...
-
शेतकरी वृद्ध असल्याने सुदैवाने बचावला अमळनेर : पाणी पिण्यासाठी पांझरा नदीत बैलांनी बैलगाडीसह धाव घेतली आणि वालखेडा येथील कोल्हापूर ब...
-
नेमकं असं असतं का शेतकरी मित्रानो जास्त फुटवा म्हणजे जास्त उत्पन्न ही समीकरणे आज कित्येक शेतकऱ्यांच्या डोक्यात असतात पण आपण कधी खोलात जाऊन व...
-
दै. तरूण गर्जना रिपोट भाऊबीजेच्या दिवशी तापी नदीत उडी मारून केली होती आत्महत्या अमळनेर : चारित्र्याचा संशय घेतल्याने पती नणंदेच्या जाचाला ...
-
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे लोक वर्गणी रद्दबातल व पाणीपट्टी वर व्याज आकारणी करू नये याबद्दल अमळनेर नगर परिषदे कडे जोरदार मागणी *...
-
साक्री तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सुविधा पूर्णपणे डासळली गेल्याने प्रशासनास पत्रव्यवहार करून हि आरोग्य विभागाने झोपेचं सोंग करून संबंधितावर...
-
नवी दिल्ली : दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होत असलेल्या ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी य...
-
शिंदखेडा प्रतिनिधी:- धुळ्ळ्याकडून शिरपूर कडे जाणाऱ्या विना वाहक शिवशाही ने रात्री ८ वाजेच्या सुमारास एसटी बस क्र. एमएच ०६ बीडब्ल्यु०४०७ ला ग...
-
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाकडून देशातील ३० शहरं भिकारीमुक्त बनवण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. यासाठी एक पायलट प्रोजेक्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा