Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

कम्युनिस्ट नेते कॉ.सुभाष काकुस्ते यांचे निधन.शेणपूर वासियांकडून दादांना अखेरचा लाल सलाम



साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट नेते कॉ. सुभाष दादा काकुस्ते (वय ७५) यांचे दीर्घ आजाराने साक्री येथे निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन भाऊ,तीन बहिणी,तीन मुली, जावई व एक मुलगा, सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते जवाहर मेडिकल फाउंडेशनचे प्रशासकीय
अधिकारी श्री.राकेश काकुस्ते यांचे वडील तर शेणपूरचे माजी सरपंच कन्हैया काकुस्ते व पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सागर काकुस्ते यांचे काका होत.कॉ.काकुस्ते किसान महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व श्रमिक शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.राज्य साखर कामगार महासंघाचे अध्यक्षपदही त्यांनी दीर्घकाळ सांभाळले.राज्यातील सत्यशोधक जागतिकीकरण विरोधी चळवळीचे ते मार्गदर्शक होते.अमळनेर विद्रोही मराठी साहित्य संमेलनात त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला होता.त्यानंच्या विविध कामांमुळे व चळवळीमुळे साक्री तालुक्यात त्यांचे खूप मोठे नाव होते ते साक्री तालुक्यातील शेणपुर गावचे भूमिपुत्र होते ही बाब शेणपुर वासियांसाठी खूप अभिमानास्पद होती.कॉम्रेड सुभाष काकुस्ते यांच्या आत्म्यास शांती लाभो यासाठी शेणपूर गावकरी यांचा वतीने सर्वाकडून कै.कॉ.सुभाष दादांना शेवटचा लाल सलाम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध