Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०२४

तांदळाच्या भुश्या खालून मद्याची तस्करी ; आयशरसह सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त पिंपळनेरचे एपीआय किरण बर्गे यांच्या पथकाची कारवाई



साक्री प्रतिनिधी- पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे हे पिंपळनेर पोलीस ठाण्यात हजर असतांना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एका छोटा आयशर गाडी क्रमांक MH 15 FV 9730 या वाहनात गुजरात राज्यात विदेशी दारु वाहतुक होणार आहे. अशी माहिती मिळालेवरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी कारवाई करणे कामी पथक तयार करून गुजरात महाराष्ट्र रस्त्यावरील मांजरी ते नकट्या हनुमंत चेक पोस्ट दरम्यान सदर वाहनाचा पाठलाग करून नकट्या हनुमंत चेक पोस्टे जवळ सदरचे वाहन थांबविले असता त्यातले आरोपी पळून गेले परंतु, सदर वाहन तपासले असता वाहनात तांदुळाच्या भुसा भरलेल्या गोण्यांचे खाली रॉयल ब्ल्यु व्हिस्की नावाच्या विदेशी दारूचे १०८ बॉक्स मिळुन आले.

वरील कार्यवाहीत

१०,३६,८००/- रुपये किंमतीची रॉयल ब्ल्यु व्हिस्की नावाची विदेशी दारु तसेच आयशर गाडी क्रमांक MH 15 FV 9730 हिची ६,००,०००/- रुपये किंमतीचे वाहन असे एकुण
१६,३६,८००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन, सदर कार्यवाही बाबत पिंपळनेर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याचे कामकाज सुरु आहे. सदर कारवाई करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध